औषधांचा तुटवडा, रूग्णांची संख्या वाढतेय
By admin | Published: August 30, 2014 11:11 PM2014-08-30T23:11:06+5:302014-08-30T23:11:06+5:30
शहरात स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, बीड येथील महिलेचा या आज एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.
Next
पुणो : शहरात स्वाइन फ्लूचे मृत्युसत्र सुरूच असून, बीड येथील महिलेचा या आज एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. प्रफ्फुलता खंडू सोंडगे असे (35 वर्षे ) असे या महिलेचे नाव असून, स्वराज्यनगर, बार्शी रस्ता बीड येथील त्या रहिवासी आहेत. आज मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
सोंडगे यांना 12 ऑगस्टपासून सर्दी, खोकला आणि तापाचा त्रस होत होता. 14 ऑगस्टपासून त्यांना श्वास घेण्यास त्रस सुरू झाला. त्यानंतर त्यांना 16 ऑगस्ट रोजी बीड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, त्या ठिकाणीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना पुढील उपचारासाठी 19 ऑगस्ट रोजी औरंगाबाद येथे हालविण्यात आले. त्या वेळी त्यांच्यावर टॅमी फ्लूचे उपचार सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणी त्यांच्या घशातील द्रवातील नमुन्याची तपासणी केली असता, त्यांना स्वाईन फ्लू झाल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना तत्काळ 23 ऑगस्ट रोजी पुण्यात उपचारासाठी हालविण्यात आले. मात्र, आज मध्यरात्री सव्वाबाराच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
दोन महिन्यांपूर्वीच आरोग्य विभागास याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप औषधे उपलब्ध झालेली नाहीत. त्यातच आज औषधांची एक्सपायरी डेट असल्याने त्याचे वाटपही बंद करण्यात आले आहे.
- डॉ. एस.टी परदेशी
(प्रभारी आरोग्य प्रमुख)
टँमी फ्लूची औषधे संपली
शहरात स्वाईन फ्लूने पुन्हा डोकेवर काढले असतानाच शहरात महापालिका, तसेच शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या टॅमीफ्लूच्या औषधांची एक्सपायरी डेट संपली असल्याने या औषधांचा तुडवडा निर्माण होणार आहे. या आजाराशी संबंधित हे औषधे महापालिकेस राज्य शासनाकडून पुरविले जाते. त्यानंतर शहरातील रूग्णालयांच्या मागणीनुसार महापालिका त्यांना या औषधांचा पुरवठा करते. शहरात मोठय़ा प्रमाणात स्वाईन फ्लूचे रूग्ण आढळून येत असल्याने, तसेच राज्यभरातील इतर जिल्हय़ातील रूग्णही उपचारासाठी पुण्यात येतात. त्यामुळे महापालिकेकडे मोठय़ा प्रमाणात या औषधांचा साठा असणो अपेक्षित आहेत. ही औषधे शासन महापालिकेस मागणीनुसार पाठविते. शासनाने मागील वेळी महापालिकेस पाठविलेल्या औषधांची एक्सपायरी डेट 30 ऑगस्ट होती. त्यामुळे कालपासून ही औषधे रूग्णांना देणो महापालिकेने बंद केलेले आहे. त्यामुळे या आजाराच्या संशयित रूग्णांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे. आज शहरात असाच एक प्रकार घडला. या आजाराची लागण झालेल्या एका रूग्णाचे नातेवाईक आरोग्य विभागासह महापालिकेच्या सर्व दवाख्यान्यांमध्ये फिरत होते. मात्र, त्यांना औषध मिळू शकले नाही. त्यामुळे या रूग्णास काय झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होतोय.
शासकीय अनास्था रूग्णांच्या जिवावर
स्वाईन फ्लूच्या औषधांची ‘एक्सपायरी डेट’ जवळ येत असल्याने दोन महिन्यांपूर्वीच ही औषधे बदलून देण्यासाठी, तसेच नवीन औषधे उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेकडून राज्य शासनाच्या आरोग्य विभागास पत्र पाठविण्यात आल्याचा दावा महापालिकेचे प्रभारी आरोग्य प्रमुख डॉ. एस.टी. परदेशी यांनी सांगितले. या औषधाची मुदत संपत असल्याने त्याचे वाटप बंद केले असल्याचेही ते म्हणाले. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पालिकेने केवळ पत्र पाठविले. त्याचा पाठपुरावा करून औषधे का उपलब्ध करून घेतली नाहीत, असा सवालही उपस्थित होत आहे. तसेच, या आजाराचे गांभीर्य तीन वर्षापूर्वीच लक्षात आले असतानाही राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून त्याकडे दुलक्र्ष होत असल्याने शासकीय अनास्थाच रूग्णांच्या जिवावर बेतली आहे.