गोळीबार करणाऱ्याला बेड्या

By Admin | Published: December 24, 2016 03:54 AM2016-12-24T03:54:45+5:302016-12-24T03:54:45+5:30

मध्य प्रदेशात गोळीबार करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रांसह मालमत्ता कक्षाने गुरुवारी बेड्या ठोकल्या

Shot of firing | गोळीबार करणाऱ्याला बेड्या

गोळीबार करणाऱ्याला बेड्या

googlenewsNext

मुंबई : मध्य प्रदेशात गोळीबार करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला घातक शस्त्रांसह मालमत्ता कक्षाने गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. राज मुराद असे अटक आरोपीचे नाव असून त्याच्याकडून दोन देशी कट्टे व २४ काडतुसे हस्तगत केली.
मालमत्ता कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एक सराईत गुन्हेगार गुरुवारी सायंकाळी ४ वाजता भायखळा परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तपास पथकाने सापळा रचून त्याला अटक केली आहे. तपासामध्ये राज मुराद सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडून दोन देशी कट्टे व २४ काडतुसे हस्तगत केली. (प्रतिनिधी)

Web Title: Shot of firing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.