देणाऱ्याने देत जावे... सुभाषबापूंकडून घेणाऱ्याने काय घ्यावे?

By Admin | Published: March 14, 2017 01:55 PM2017-03-14T13:55:54+5:302017-03-14T13:55:54+5:30

देणाऱ्याने देत जावे... सुभाषबापूंकडून घेणाऱ्याने काय घ्यावे?

Should the payer give it ... What should they take from Subhash Bapu? | देणाऱ्याने देत जावे... सुभाषबापूंकडून घेणाऱ्याने काय घ्यावे?

देणाऱ्याने देत जावे... सुभाषबापूंकडून घेणाऱ्याने काय घ्यावे?

googlenewsNext

देणाऱ्याने देत जावे... सुभाषबापूंकडून घेणाऱ्याने काय घ्यावे?
राजा माने - आॅनलाईन लोकमत सोलापूर
सोलापूर दि़ १४ - सारस्वतातील साहित्य पूजकांचे दैवत विं.दा. करंदीकर यांची अजरामर शब्दगुंफण... ‘देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे... घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे...’
आज धुलिवंदनाच्या मुहूर्तावर विंदांच्या त्या काव्यपंक्तीचे स्मरण होण्याचे कारण म्हणजे नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा कालचा जयंती दिन आणि योगायोगाने त्याच दिवशी असलेला आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र, राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योगमंत्री आणि ‘लोकमंगलकार’ सुभाष देशमुख यांचा वाढदिवस ! खरं तर कविवर्य करंदीकरांना देणाऱ्याचे ‘हात घ्यावे’ याचा अर्थ देणाऱ्याच्या व्यक्तिमत्त्वातील जे जे चांगले ते घेणाऱ्याने घ्यावे, असाच आहे. मग महाराष्ट्राने स्व.यशवंतरावजीकडून काय घेतले, या प्रश्नाचं उत्तर उभा महाराष्ट्र देऊ शकेल. पण त्याचे अस्सल राजकीय उत्तर मात्र त्यांचे ‘मानसपुत्र’ शरदचंद्र पवार हेच देऊ शकतील ! असो.. आपल्या जिल्ह्याच्या सुभाषबापूंनी आपल्या वाढदिवसनिमित्ताने येणारे हार-तुरे अन् सत्कार नाकारले. देणाऱ्यांच्या फक्त ‘शाब्दिक अन् भावनिक’ शुभेच्छा-सदिच्छाच त्यांनी स्वीकारल्या ! त्या बदल्यात त्यांनी शुभेच्छुकांना काय दिले असेल आणि त्यांनी सुभाषबापूंकडून काय घ्यावे? पुन्हा हा प्रश्न पडतोच ! धुलिवंदनाच्या पार्श्वभूमीवर या प्रश्नाच्या उत्तराचा शोध घ्यावासा वाटतो.
भाजपच्या संसारात मांडीला मांडी लावून दुनियादारी निभावणाऱ्या पालकमंत्री व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांचे ‘मालक’ विजयकुमार देशमुख यांनी सुभाषबापूंकडून काय घ्यावे? सव्वा वर्षाच्या कारकिर्दीची लटकती तलवार असलेल्या नूतन महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी काय घ्यावे ? भाजप प्रवेशाची हुलकावणी देऊन सेनेचा गड मजबूत करणाऱ्या महेशअण्णा कोठेंनी काय घ्यावे ? गटबाजीच्या निष्ठा वाहणाऱ्या व राजेंद्र राऊत यांच्या आगमनाने हिरमुसलेल्या राजेंद्र मिरगणे यांनी काय घ्यावे ? आमदारकीवर निलंबन ओढावलेल्या प्रशांत परिचारक यांनी काय घ्यावे ? कचरा टेंडर प्रकरणात समर्थक-विरोधक असलेल्या नवख्या नगरसेवक-नगरसेविकांनी काय घ्यावे? मालक गटाची धुरा वाहणाऱ्या प्रा.अशोक निंबर्गी सरांनी काय घ्यावे? स्वीकृत सदस्यत्वाच्या चर्चा चक्रव्यूहात अडकलेल्या अविनाश महागावकरांनी काय घ्यावे ? ऊन-सावल्यांच्या प्रत्येक फेऱ्यात अतुट संगत-निष्ठा वाहणाऱ्या शहाजी पवार-इंद्रजित पवार यांनी काय घ्यावे? आणीबाणीच्या काळात तत्कालीन सत्ताधारी आणि पोलीस प्रशासनाविरूध्द संघर्ष केलेले, तुरूंगवास भोगलेले विश्वनाथ बेंद्रे, छोटूभाई लोहिया, बंडू कुलकर्णी, राष्ट्रवादीतून स्वगृही आलेले माजी आमदार नरसिंग मेंगजी आणि बापूंचे ‘मानस जावई’ नरेंद्र काळे यांनी बरे बापूंकडून काय घ्यावे?करमाळ्याच्या आमदारकी सुरक्षेवर प्रेम करणाऱ्या सेनेच्या आ.नारायण पाटील यांनी काय घ्यावे? चंद्रकांतदादांच्या साथीने जि.प.चा डाव मांडत असलेल्या संजयमामा शिंदे यांनी काय घ्यावे? भाजपच्या सीमेवरच रोखल्या गेलेल्या खा.विजयदादा अन् रणजितसिंह मोहिते-पाटलांनी काय घ्यावे? बैठक यशस्वी होऊनही लाल दिव्याने हुलकावणी दिलेल्या बबनदादा शिंदे यांनी काय घ्यावे? स्वामी समर्थांवर निष्ठा वाहणाऱ्या सिद्धाराम म्हेत्रे, सिद्रामप्पा पाटील आणि सचिन कल्याणशेट्टी यांनीही काय घ्यावे? सरतेशेवटी पण अटळ संघ परिवाराच्या सच्चे अन् मोहन डांगरे, प्रशांत बडवे या जाणत्यांच्या सांत्वनावर समाधान मानत राहिलेल्या स्वयंसेवकांनी काय घ्यायचे? असे एक ना अनेक प्रश्न उभ्या जिल्ह्याच्या मनात थैमान घालू शकतात. आता काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दीपकआबा साळुंखेंपासून दिलीप माने मालकांपर्यंतच्या अनेकांच्या मनातील सुभाषबापूंकडून काय घ्यावे? या प्रश्नाची उत्तरं शोधण्याच्या फंद्यात आम्ही पडणार नाही. पण बापूंनी सामुदायिक विवाह, अन्नपूर्णा योजनापासून ते थेट सात-बारा धारकाला सोसायटीचे सदस्यत्व बहाल करण्याच्या ऐतिहासिक निर्णयासारखे जे योगदान दिले त्या देण्याच्या प्रक्रियेला गतिमान करावे असे मात्र म्हणू शकतो. ते करताना नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नक्की काय घ्यायचे हे ठरविण्याची त्यांची क्षमता अधिक ताकदवान होवो ही शुभेच्छा मात्र सोलापूर जिल्हा बापूंना वाढदिवस निमित्ताने देतो आहे, हे कोण नाकारणार?

Web Title: Should the payer give it ... What should they take from Subhash Bapu?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.