कर्नाटकला निदान बाहुबलीचा ट्रेलर तरी दाखवा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2017 07:33 AM2017-05-24T07:33:49+5:302017-05-24T07:53:27+5:30

कर्नाटकात जय महाराष्ट्र बोलल्यावर लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द केलं जाईल असं वक्तव्य करणा-या मंत्री रोशन बेग यांच्यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सणसणीत टीका केली आहे

Show Karnataka's diagnosis of Bahubali trailer, Uddhav Thackeray chaired by CM | कर्नाटकला निदान बाहुबलीचा ट्रेलर तरी दाखवा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

कर्नाटकला निदान बाहुबलीचा ट्रेलर तरी दाखवा, उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना चिमटा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - कर्नाटकात जय महाराष्ट्र बोलल्यावर लोकप्रतिनिधींचं सदस्यत्व रद्द केलं जाईल असं वक्तव्य करणा-या मंत्री रोशन बेग यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला आहे. कोणतेही राज्य व त्या राज्याची भाषा एकमेकांचे दुश्मन नाहीत. तुम्हाला, म्हणजे रोशन बेगसारख्यांना पाकड्य़ांचा जयजयकार चालतो, नव्हे त्यासाठी प्रोत्साहनच दिले जाते. पण त्याच पाकड्य़ांना अंगावर घेणाऱ्या महाराष्ट्राचा जय तुम्हाला नको असेल तर रोशन बेगसारख्या नादान माणसाची लुंगी उतरवून त्याची डीएनए चाचणी करायलाच हवी. त्यांच्या अंगात स्वच्छ स्वदेशी रक्त असूच शकत नाही. ही अवलादच देशाला भारी पडत आहे; पण महाराष्ट्र त्यांच्या छाताडावर बसून ‘जय महाराष्ट्र’चा गजर केल्याशिवाय राहणार नाही! असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. 
 
मुख्यमंत्री फडणवीस यांनीही आपण ‘बाहुबली पार्ट टू’ दाखवायला तयार आहोत, असे आव्हान राजकीय विरोधकांना दिले आहे. हा जो काही ‘बाहुबली पार्ट टू’ आहे तो तुम्ही दाखवायचा तेव्हा दाखवाच, पण आधी मराठी अस्मितेवर घाला घालणाऱ्या कर्नाटक सरकारला बाहुबलीचा निदान ट्रेलर तरी दाखवा एवढी आमची मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती आहे असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 
 
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या मराठीपणाचा अभिमान असेल तर त्यांनी तत्काळ बेळगावात जाऊन मराठीजनांस दिलासा द्यायला हवा. सीमा भागातील मराठीजनांना अपमानित करण्याचे व त्यांच्यावर अत्याचार करण्याचे नवे कारस्थान रोज तेथील राज्यकर्ते रचत आहेत व महाराष्ट्राचे तकलादू मराठी राज्यकर्ते कानडय़ांच्या दमनचक्रावर मूग गिळून गप्प बसले आहेत अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे. 
 
कर्नाटकचा एक भ्रष्ट आणि बकवास मंत्री रोशन बेग याने धमकी दिली आहे की, सीमा भागात निवडून आलेले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी ‘जय महाराष्ट्र’ म्हटल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द केले जाईल. तसा कायदा विधानसभेत आणण्याचे नक्की झाले आहे. कर्नाटकच्या विधानसभेत महाराष्ट्र एकीकरण समितीचे आमदार आहेत. बेळगावच्या महानगरपालिकेवर तर मराठीजनांचा भगवाच फडकला आहे. इतर नगरपालिकांतही महाराष्ट्रवादी सदस्य मोठ्य़ा प्रमाणावर आहेत. त्यांच्या ‘जय महाराष्ट्र’ बोलण्यावर बंदी आणणाऱया रोशन बेगने हिंदुस्थानचे नागरी स्वातंत्र्य आणि घटनेवरच थुंकण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात ६०-६५ वर्षांपासून सीमावाद आहे व सध्या हा सीमावाद सर्वोच्च न्यायालयात उद्धाराची वाट पाहात आहे. मुळात प्रकरण न्यायप्रविष्ट असताना रोशन बेगने अशी बांग देणे हा न्यायालयाचा अपमान आहे असं उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
अन्य राज्यांचा जयजयकार करणे हा घटनात्मकदृष्ट्य़ा गुन्हा कसा ठरू शकतो? खरे म्हणजे कर्नाटकात ‘जय महाराष्ट्र’वर घातली जाणारी बंदी हा आता फक्त मराठी अस्मितेचाच मुद्दा राहिलेला नसून राष्ट्रीय एकात्मता आणि अखंडतेचा मुद्दा बनलेला आहे. रोशन बेग व त्यांच्या पिलावळीने मधल्या काळात वक्फ बोर्डाच्या जमिनी गिळून इस्लामद्रोह केलाच आहे. असा हा भ्रष्ट व नादान मंत्री ‘जय महाराष्ट्र’च्या विरोधात बकवास करतो हा शिवरायांचा अपमान आहे असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत. 
 
कर्नाटकात अनेक ठिकाणी पाकिस्तानचे झेंडे फडकवून पाकिस्तान झिंदाबादचे नारे दिले जातात त्या पाकड्य़ांविरुद्ध बोलण्याची हिंमत कधी त्या लांड्य़ा रोशन बेगने दाखवली आहे काय? हिंदुस्थानात दहशतवाद घडविण्याचे सूत्रधार कर्नाटकच्या भूमीवरूनच देशद्रोही कारवाया करीत होते. पाकिस्तानी ‘आयएसआय’चे हात रोशन बेगच्या डोळ्य़ांसमोर अतिरेकी हल्ल्यांचे ‘महान राष्ट्रीय कार्य’ करीत असतानाही हा रोशन बेग त्यांच्या हिरव्या लुंगीतून डोके बाहेर काढायला तयार नाही; पण आता ‘जय महाराष्ट्र’ बोलणाऱ्यांना मात्र इशारे देत फिरत आहे. हा सरळ सरळ मस्तवालपणा आहे अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे. 
 
महाराष्ट्र सरकारने सीमा प्रश्न व तेथील बांधवांच्या समस्या निवारणासाठी चंद्रकांत पाटील या मंत्र्यांची नेमणूक केली आहे. आता चंद्रकांत पाटील यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहितील. वकिलांकडून कायदेशीर बाजू समजून घेऊन हे पत्र लिहिले जाईल. पाटील यांनी सरकारी पातळीवर सरकारी पद्धतीने हे जे काही करायचे आहे ते करावेच, पण रोशन बेग काय किंवा मराठीद्वेषाचा वडस असलेले कर्नाटकचे सत्ताधारी काय, त्यांना हा ‘शब्दां’चा मार पुरेसा नाही. त्यामुळे त्यांना शहाणपण सुचण्याचीही शक्यता नाही. त्यापेक्षा निदान चंद्रकांत पाटलांनी तरी कोल्हापुरातून बेळगावचा रस्ता धरावा व तेथील जनतेस दिलासा द्यावा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं आहे. 
 
बेळगावसह सीमा भागातील मराठी बांधवांवर केले जाणारे अत्याचार हे अतिरेकी कारवायांइतकेच भयंकर आहेत. मात्र तरीही या प्रश्नावर कोणताही राष्ट्रीय पक्ष तोंड उघडत नाही. अशा वेळी त्यांच्या अंगावर ‘राष्ट्रीय’ झूल चढलेली असते. मग काही दशकांपूर्वी विनाकारण घालून ठेवलेला सीमावादाचा घोळ संपवायचा कोणी? दोन प्रांतांमधील असला तरी हादेखील शेवटी प्रश्नच आहे आणि एकटी शिवसेनाच त्याविरुद्ध एल्गार पुकारत असते अशी खंत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

Web Title: Show Karnataka's diagnosis of Bahubali trailer, Uddhav Thackeray chaired by CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.