शाळाबाह्य मुले दाखवा, ५०० रुपये बक्षीस मिळवा
By Admin | Published: February 11, 2016 01:35 AM2016-02-11T01:35:54+5:302016-02-11T01:35:54+5:30
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याअंतर्गत शाळाबाह्य मुले दाखवा आणि ५०० रुपये बक्षीस मिळवा, अशी योजना शासनाच्या
- अखिलेश अग्रवाल, पुसद (यवतमाळ)
शिक्षणहक्क कायद्यांतर्गत प्रत्येक बालकाला शिक्षण मिळावे, यासाठी शासन विविध उपक्रम राबवित आहे. याअंतर्गत शाळाबाह्य मुले दाखवा आणि ५०० रुपये बक्षीस मिळवा, अशी योजना शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने सुरू केली आहे.
ही योजना २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येणार असून शाळेच्या पटावर नाव नसलेल्या मुलाला दाखविणाऱ्यांना मुलास शाळेत दाखला दिल्यानंतर मुख्याध्यापकाकडून ५०० रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तसेच शिक्षण हमीपत्र न घेता स्थलांतरित होऊन आलेली आणि राज्याबाहेर स्थलांतरित होऊन आलेले पण, एक महिन्याच्या आत शाळेत दाखल न झालेल्या मुलामागे २५० रुपये बक्षीस देण्याची ही योजना राहणार आहे. यासाठी सर्व खर्च सर्वशिक्षा अभियानातून केला जाणार आहे.
स्थलांतरित मजुरांची मुले सर्वाधिक शाळाबाह्य असतात. अशा मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी या सत्रापासून शिक्षण हमी कार्ड दिले जाईल. हे कार्ड असलेला मुलगा राज्यातील कोणत्याही शाळेत प्रवेश मिळवू शकतो. कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थी शाळाबाह्य ठरू नये यासाठी प्रयत्न केले जात आहे.
- सुचिता पाटेकर,
शिक्षणाधिकारी, यवतमाळ