भाजपा सरकारला जागा दाखवू!, उस्मानाबादच्या जनआक्रोश सभेत काँग्रेसचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 05:43 AM2017-11-06T05:43:25+5:302017-11-06T05:43:39+5:30

नोटबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाने घसरलेली अर्थव्यवस्था, शेतकºयांना देशोधडीला लावणारे, रोजगार हिरावून घेणारे निर्णय, घोटाळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे़

Show the seats to the BJP government !, the determination of the Congress in Osmanabad public meeting | भाजपा सरकारला जागा दाखवू!, उस्मानाबादच्या जनआक्रोश सभेत काँग्रेसचा निर्धार

भाजपा सरकारला जागा दाखवू!, उस्मानाबादच्या जनआक्रोश सभेत काँग्रेसचा निर्धार

googlenewsNext

उस्मानाबाद : नोटबंदी, जीएसटीच्या अंमलबजावणीतील गोंधळाने घसरलेली अर्थव्यवस्था, शेतकºयांना देशोधडीला लावणारे, रोजगार हिरावून घेणारे निर्णय, घोटाळ्यांमुळे सामान्य माणूस त्रस्त आहे़ त्यामुळे सरकारला त्यांची जागा दाखवून देण्याच्या निर्धारासह काँग्रेसने ‘बोलो जवानों हल्लाबोल, मोदी सरकारपर हल्लाबोल’ असा नारा दिला़
काँग्रेसच्या वतीने उस्मानाबाद येथे रविवारी मराठवाडा विभागीय जनआक्रोश सभा घेण्यात आली. अध्यक्षस्थानी काँग्रेसचे महाराष्टÑ प्रभारी मोहन प्रकाश होते. प्रकाश म्हणाले, आम्ही केलेल्या कामांचे उद्घाटन करीत फिरणारे मोदी, मागील साठ वर्षांत काय केले म्हणून विचारतात? सध्या मोदी हे विदेशी शक्तींच्या विचारधारेवर देश चालवत आहेत’.

दाढीवाल्यांनी भुलविले...
मोहन प्रकाश यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व रामदेवबाबा यांचा थेट नामोल्लेख न करता पांढरी दाढीवाले व काळी दाढीवाले असा उल्लेख करीत निवडणुकीपूर्वी त्यांनी जनतेला भूल घातल्याचे सांगितले.

शिवसेना लाचार : भाजपा सरकारची तीन वर्षे साजरी करीत आहे. याचवेळी सत्तेतून बाहेर पडू, असे सातत्याने सांगणाºया शिवसेनेने ‘खोटे बोलण्याची’ तीन वर्षे साजरी करावी, असा सल्ला राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिला. सेनेत स्वाभिमान उरला नसून, त्यांचे पदाधिकारी ‘वर्षा’वर लाचारी पत्करत असल्याची टीकाही विखे यांनी केली.

Web Title: Show the seats to the BJP government !, the determination of the Congress in Osmanabad public meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.