सोशल मीडियामधून मुख्यमंत्र्यांवर कौतुकाचा वर्षाव
By admin | Published: June 24, 2017 06:31 PM2017-06-24T18:31:55+5:302017-06-24T18:31:55+5:30
शेतक-यांसाठी 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताच काही तासात #Devendra4Farmers हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 24 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतक-यांसाठी 34 हजार कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर करताच काही तासात #Devendra4Farmers हा हॅशटॅग ट्रेंडिगमध्ये आला आहे. मागच्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे सर्वचजण आता त्यांचे कौतुक करत आहेत.
टि्वटरवरुन व्यक्त झालेल्या बहुतांश प्रतिक्रियांमधून मुख्यमंत्र्यांच्या कृषीकर्जमाफीच्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले आहे. तुम्ही चांगला निर्णय घेतला आता शेतक-यांच्या कृषीमालाला चांगला भाव मिळवून द्या असे काहींनी म्हटले आहे तर, कर्जमाफीला मदत म्हणून मंत्री आणि भाजपा आमदरांचे एक दिवसाचे वेतन देण्याच्या निर्णयाचे कौतुक करण्यात आले आहे.
Kudos @Dev_Fadnavis Excellent step as All Ministers & MLAs will give 1month salary to support Loan waiver in Maharashtra #Devendra4Farmers
— Karan Sharma (@IKaransharma27) June 24, 2017
Thank You Devendra, for reducing the burden of our farmers. Provide good MSP, so that farmers get what they deserve. #Devendra4Farmers
— Sara Ali Khan (@SaraKhanWorld) June 24, 2017