लग्नमंडपातून अल्पवयीन नवरीची सैराट धूम
By Admin | Published: May 20, 2016 01:16 PM2016-05-20T13:16:15+5:302016-05-20T13:16:15+5:30
अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफ्रेंडसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़ विशेष म्हणजे या मुलीने आई- वडिलांविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे.
ऑनलाइन लोकमत
संगमनेर, दि. २० - अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफ्रेंडसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़ विशेष म्हणजे या मुलीने आई- वडिलांविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे.
घुलेवाडी येथील एका अल्पवयीन मुलीचे जबरदस्तीने लग्न लाऊन दिले जात होते. या मुलीचे दुसऱ्या मुलावर प्रेम होते. तिच्या इच्छेविरुद्ध लग्न जमवले व विवाह मंडपात अक्षताही पडल्या़. लग्न लागल्यानंतर नवऱ्याला घास भरवित असताना तिच्या जुन्या बॉयफ्रेंडची मंडपात एन्ट्री झाली अन् दोघांनीही सैराट धूम ठोकली़ या मुलीला व तिच्या प्रियकराला मुलीच्या नातेवाईकांनी पकडले.
त्यानंतर मुलीला घरी नेले़ मात्र, शुक्रवारी सकाळीच या मुलीने प्रियकरासोबत संगमनेर शहर पोलीस ठाणे गाठून आई-वडिलांविरोधात बळजबरीने लग्न लावून दिल्याप्रकरणी फिर्याद दिली असून पोलिसांनी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकूणच हा सर्व प्रकार चित्रपटातील दृश्याला शोभणारा होता.