ट्विटरवर सहानुभूतीचा पाऊस

By admin | Published: May 6, 2015 11:42 PM2015-05-06T23:42:58+5:302015-05-07T02:37:42+5:30

सलमान खानला पाच वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होताच बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी सलमान खानला पाठिंबा दर्शवला.

Shower of sympathy on Twitter | ट्विटरवर सहानुभूतीचा पाऊस

ट्विटरवर सहानुभूतीचा पाऊस

Next

मुंबई, दि. ७ - सलमानच्या निकालाबाबत सकाळपासूनच टि¦ट्सचा अक्षरश: पाऊस पडला.  बहुतांशी कलाकार शिक्षेबद्दल दु:ख व्यक्त करत होते.

 
सुभाष घई : न्यायालयाने सलमानबाबत दिलेल्या निर्णयाचा आम्ही सर्व आदर करतो. मात्र, आमच्या क्षेत्रतील सर्व जण सलमानला एक  सुह्रदय व्यक्ती म्हणून ओळखतात. मी त्याच्यासाठी मनोभावे प्रार्थना करतो.
 
वाजिद अली 
हा अत्यंत दु:खद क्षण आहे. निकालाने मला धक्का बसला आहे. सलमान भाई साधा आणि सच्च आदमी आहे. (सलमानचा अत्यंत जवळचा मित्र व संगीतकार)
 
साजीद खान
सलमान व त्याच्या कुटुंबियांना पाठिंबा व त्यांच्यासाठी प्रार्थना. या दुख:द प्रसंगी ईश्वर त्यांना धैर्य देवो. 
 
डेझी शाह : सलमान अत्यंत सुह्रदय व्यक्ती आहे. त्याचे हृदय सोन्याचे असून ते कोणीही बदलू शकत नाही. बातमी दु:खदायक आहे. मात्र  ती स्वीकारावी लागेल.
 
कुणाल कोहली
सलमानविरुद्धच्या या निकालाने अतीव दु:ख झाले. सलमान व त्याच्या  कुटुंबियांसाठी प्रार्थना. 
 
सोफी चौधरी
मी कायद्याचा आदर करते. पण निकालाचे दु:ख होते.  
 
भाग्यश्री
न्यायालयाचा निकाल. माङो ह्रदय सलमान आणि त्याच्या कुटुंबियांसोबत आहे. जे काही घडले त्याबद्दल त्याने खूप मानसिक त्रस सोसला आहे. परंतु आपणास कायदा पाळावा लागेल.
 
आशिष चौधरी
कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही हे मला ठाऊक आहे. परंतु मला हे ही ठाऊक आहे की, सलमानचे ह्रदय विशाल असून त्याचे कुटुंब प्रेम आणि कनवाळूपणाचे मूर्तीमंत उदाहरण आहे. मी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो.
 
अमीषा पटेल
हे ठीक नाही. सलमानसाठी व त्याच्या कुटुंबियाला सामथ्र्य मिळावे यासाठी प्रार्थना. आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत.
 
करण जोहर : मी आता केवळ भावनेने प्रतिक्रिया देऊ शकतो. सलमान आणि त्याच्या कुटुंबियांसाठी माझी प्रार्थना. त्यांना धैर्य मिळावे. 
 
प्रिती झिंंटा : निकाल ऐकून धक्काच बसला. सलमानने गेल्या अनेक वर्षात हजारो लोकांना मदत करून अनेकांचे प्राण वाचवले आहेत. न्यायालय हे विचारात घेईल, अशी आशा आहे. 

सानिया मिर्झा - आता बोलण्यासारखे दुसरे काही नाही. सलमान तू कायम खंबीर राहतोस, तसाच राहा.
 
हेमामालिनी -  सलमानविषयी मला सहानभूती आहे. मी प्रार्थना करते की, त्याला जास्त शिक्षा होऊ नये


वरुण धवन - सलमान खूप मोठा माणूस आहे. सिनेसृष्टीत सर्वांना मदत करणारी व्यक्ती म्हणून सलमानची ओळख आहे
 
सोनाक्षी सिन्हा -  धक्कादायक बातमी आहे. काय बोलायचे मला कळत नाहीये पण मी कोणत्याही परिस्थीतीत सलमानच्या पाठिशी आहे. तो एक चांगला माणूस आहे आणि त्याचा चांगूलपणा कोणी हिरावून घेऊ शकत नाही.


मनोज तिवारी - न्यायालयाचा निर्णय स्विकारायलाच हवा. पण मी सलमानसाठी प्रार्थना करणार आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये नेहमीच प्रत्येकाला मदत करण्यासाठी सलमान पुढाकार घेतो. याचाही न्यायालयाने विचार करावा.

चिरंजीवी - अजूनही वरच्या न्यायालयात सलमान अपील करू शकतो. त्यासाठी सर्वांनी मिळून सलमानसाठी प्रार्थना करायला हवी.


बाबूल सुप्रिया - सलमानच्या बाबतीत हे घडेल, असे वाटले नव्हते. त्याचे वाईट वाटते. सलमानसोबत मी दीर्घकाळ काम केले आहे. त्यामुळे न्यायालयाने सलमानचे सामाजिक कार्य आणि बदललेली वागणूक लक्षात घेऊन कमी शिक्षा द्यावी, असे वाटते.

आलिया भट - आपल्या माणसाला या परिस्थितीत पाहणे कठीण आहे. हे वेदनादायक आहे. सलमान आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि आम्ही सर्व तुझ्या पाठीशी आहोत.

बिपाशा बासू - सलमानने कायम समाजातील दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. सामाजिक भान असणार्‍या या अभिनेत्याबाबत योग्य निर्णय अपेक्षित आहे.


दिया मिर्झा - सलमानच्या खटल्याबाबत माझे काही म्हणणे नाही. पण त्याच्याशी माझे भावनिक नाते आहे. त्याने माझ्या आईचे आयुष्य वाचविले आहे. 

रितेश देशमुख -  न्यायालयाच्या निर्णयाबाबत काही म्हणणे नाही. मात्र सलमानबद्दल मला नितांत प्रेम आहे, तो मला भेटलेला दिलदार माणूस आहे

मिका सिंग -  जो सर्वांसाठी उभा असतो, त्याच्यासाठी मी उभा राहणारच. सलमान तुझा नेहमीच आदर वाटतो. मी आणि तुझे सर्व चाहते तुझ्यासोबत आहोत
 
शोभा डे -  आता ही खरी वेळ आहे योग्य माणूस बनण्याची!


हा अतिशय कठीण काळ आहे. संपूर्ण कपूर कुटुंबिय सलीम खान यांच्यासोबत आहे.
- ऋषी कपूर, अभिनेता

फराह खान - मी दुबईमध्ये आहे. पण सलमान आणि त्याच्या परिवारासाठी प्रार्थना कायम सुरु आहेत.
































 

Web Title: Shower of sympathy on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.