ज्येष्ठांसाठी कोकण रेल्वेची ‘श्रावण सेवा’!
By admin | Published: December 29, 2015 02:15 AM2015-12-29T02:15:24+5:302015-12-29T02:15:24+5:30
ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांना त्यांच्याकडे असलेले मोठे सामान उचलण्यासाठी कोकण रेल्वेने ‘श्रावण सेवा’ नावाची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेत ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस
मुंबई : ज्येष्ठ नागरिक असलेल्या प्रवाशांना त्यांच्याकडे असलेले मोठे सामान उचलण्यासाठी कोकण रेल्वेने ‘श्रावण सेवा’ नावाची सुविधा सुरू केली आहे. या सुविधेत ज्येष्ठ नागरिकांना मदतनीस पुरवण्यात येतो. त्याला ज्येष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
ज्येष्ठ नागरिकांकडे बरेच सामान असल्यास त्यांना डब्यात चढता-उतरताना कसरत करावी लागते. अशा प्रवाशांना स्थानकावर मदतनीस देण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला. प्रवास सुरू होण्याच्या तासाभरापूर्वी किंवा प्रवास संपण्याअगोदर ज्येष्ठ नागरिकांना पीएनआर क्रमांक, कोच, बर्थ क्रमांकाची माहिती मोबाइल क्रमांक ९६६४0४४४५६ वर पाठवायची आहे. त्यानंतरच या सेवेचा लाभ प्रवाशांना घेता येईल. आतापर्यंत चिपळूण, रत्नागिरी, थिविम, करमाळी आणि मडगाव स्थानकावर ही सेवा सुरू करण्यात आली असून, १६00 ज्येष्ठ नागरिकांनी त्याचा लाभही घेतल्याची माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली. ज्येष्ठ नागरिकांनी या सेवेचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्वेकडून करण्यात आले आहे.