४ क्विंटल बटाट्यांपासून श्रींची मूर्ती

By admin | Published: September 8, 2016 11:30 PM2016-09-08T23:30:28+5:302016-09-08T23:30:28+5:30

नवीन संकल्पना पुढे ठेवत तब्बल साडेचार क्विंटल बटाटांच्या साह्याने लाडक्या गणरायाची बनविलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षण बनली आहे.

Shree's idol from 4 quintals of potatoes | ४ क्विंटल बटाट्यांपासून श्रींची मूर्ती

४ क्विंटल बटाट्यांपासून श्रींची मूर्ती

Next

ऑनलाइन लोकमत

हिंगोली, दि. 8 - शहरातील मस्तानशहा नगरात बुरुड समाजाच्या वतीने यंदाही एक नवीन संकल्पना पुढे ठेवत तब्बल साडेचार क्विंटल बटाटांच्या साह्याने लाडक्या गणरायाची बनविलेली मूर्ती सर्वांचेच आकर्षण बनली आहे. या संकल्पनेने एक तर मोठया खर्चालाही बगल मिळाली असून, आपली कला कायम पुढे ठेवण्यास या समाजातील युवकास संधी मिळाली आहे.

बुरुड समाज म्हटले की, नक्षीकाम आलेच. या समाजातील प्रत्येक युवकास नक्षीकाम करण्याची अगदी लहानपणापासूनच सवय जडलेली असते. ती पुढे कायम ठेवण्यासाठी या युवकातर्फे तसे प्रयत्नही केले जातात. या गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन मूर्ती साकारली जाते.

तसेच विविध स्पर्धा व आरोग्य तपासणी शिबीरही घेतले जातात. मागील १८ वर्षांपासून या मंडळातर्फे गणेशोत्सव साजरा केला जातो. १९९९ मध्ये श्रीची मूर्ती बसविण्यास या मंडळाने सुरुवात केली आहे. प्रथम सुप टोपलीची श्रींची मूर्ती, नंतर कवडी-सुपारी, नाराळाच्या जटा, केळीच्या साह्याने मूर्ती बनवून सर्वांचे लक्ष वेधले. यंदा बनविण्यात येणाऱ्या श्रीच्या मूर्तीवर विचार विनिमय झाल्यावरच मंडळाची कार्यकारिणी गठीत केली. जवळपास, चार ते पाच फळांची नावे समोर ठेवली जातात. त्यातून एका फळाचे नाव निवडले जाते.

यंदाच्या गणेश मंडळाचे अध्यक्ष बाबूराव जोरगेवार, तर उपाध्यक्ष अनील उरेवार, सचिव मनोज देवके हे आहेत. यंदा तब्बल साडे चार क्विंटल बटाटे धाग्याचा आधार घेत मूर्तीकार अब्बय्या प्रभू गुडमलवार, भगवान उरेवार, रमेश उरेवार, राजेश गुडमलवार, पुरुषोत्तम जोरगेवार, संजय उरेवार, ईश्वर उरेवार, गंगाधर जोरेवार, शंकर गुडमलवार आदींनी मूर्ती बनविली आहे. तसेच १२ सप्टेंबर रोजी येथे नेत्र तपासणी शिबिरासह इतरही शिबिरे ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले. दरवर्षी करण्यात येणाऱ्या श्रींच्या मूर्त्तीची सर्वत्र चर्चा होत असते.

Web Title: Shree's idol from 4 quintals of potatoes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.