अंगारकीनिमित्त श्रींचे दर्शन सोमवारी मध्यरात्रीपासून
By admin | Published: July 12, 2014 12:43 AM2014-07-12T00:43:12+5:302014-07-12T00:43:12+5:30
संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी येणा:या भाविकांना सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
Next
मुंबई : श्री सिद्धिविनयाक गणपती मंदिरतर्फे 15 जुलै रोजी असणा:या अंगारकी संकष्टी चतुर्थीनिमित्त श्रींच्या दर्शनासाठी येणा:या भाविकांना सोमवारी मध्यरात्री 1.30 वाजल्यापासून मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे.
अंगारकीनिमित्त सोमवारी मध्यरात्री 12.1क् ते 1.3क् या वेळेत काकड आरती आणि महापूजा होणार आहे. यानंतर मध्यरात्री 1.3क् ते पहाटे 3.15 वाजेर्पयत, पहाटे 3.5क् ते रात्री 8.15 वाजेर्पयत आणि रात्री 1क्.15 ते रात्री 2 र्पयत या वेळेत श्रींचे दर्शन घेता येईल. पहाटे 3.15 ते 3.5क् या वेळेत श्रींची आरती करणार आहे. रात्री 8.15 ते 1क्.15 र्पयत श्रींची महापूजा, नैवेद्य आणि आरती करण्यात येणार आहे.
मुखदर्शनासाठी येणा:या भाविकांना आगार बाजार येथून रात्री 1.3क् वाजल्यापासून आत सोडण्यात येणार आहे. या रांगेतील भाविकांना मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 5 मधून प्रवेश देण्यात येणार आहे. पुरुषांसाठी महाराष्ट्र हायस्कूलचा पदपथ, सिल्व्हर अपार्टमेंट, रचना संसद महाविद्यालय ते रवींद्र नाटय़ मंदिर येथून प्रवेश दिला जाणार आहे. पुरुषांना नदरुल्ला टँक मैदानावर उभारलेल्या मंडपामध्ये सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रवेश देणार आहे. श्रींचे गाभा:यातून दर्शन घेण्यासाठी रात्री 1.3क् वाजता मंदिर प्रवेशद्वार क्रमांक 2 मधून प्रवेश देणार आहे. महिलांना राऊळ मैदानाच्या बाहेरील पदपथावरून ठाकूरवाडी, कॉन्व्हेंट शाळेच्या पदपथावरून नदरुल्ला टँक मैदानात प्रवेश मिळेल. मैदानात सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)