‘श्रीसूर्या’ घोटाळय़ातील एजंटचे वासनकर समूहाशी लागेबांधे
By admin | Published: May 12, 2014 12:16 AM2014-05-12T00:16:28+5:302014-05-12T00:20:49+5:30
अकोला येथील आरोपी एजंटचे ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक
अकोला: श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या घोटाळ्यातील अकोला येथील आरोपी एजंटचे ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांनी फसवणूक करणार्या नागपूर येथील वासनकर समूहाशी लागेबांधे असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. या एजंटने सुरुवातीला ह्यश्रीसूर्याह्णच्या गुंतवणूकदारांना वासनकर समूहामध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, वासनकर समूहाची मेंबरशिप आणि शेअरची किंमत ह्यश्रीसूर्याह्णपेक्षा जास्त होती. त्यामुळे हे एजंट गुंतवणूकदारांना वासनकर समूहाऐवजी ह्यश्रीसूर्याह्णमध्ये गुंतवणूक करण्यास सांगत होते, असेही सूत्रांचे म्हणणे आहे. वासनकर समूहाच्या मालकांसह ९ जणांविरुद्ध नागपूरच्या आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी गुन्हा दाखल केल्यानंतर समूहाचे अकोल्यातील गुंतवणूकदार हादरले आहेत. नागपूर येथील श्रीसूर्या कंपनीचा मुख्य प्रवर्तक समीर जोशी, पल्लवी जोशी यांनी अकोल्यात येऊन गुंतवणूकदारांचा मेळावा घेतला होता. मेळावा घेण्यासाठी जोशी दाम्पत्याला अकोल्यातील एजंटांनी मदत केली होती. सुरुवातीला गुंतवणूकदारांना काही रकमेचे धनादेश मिळाले; परंतु नंतर धनादेश मिळणे बंद झाले आणि श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीचा भंडाफोड झाला. या प्रकरणी रामदासपेठ पोलिस ठाण्यात जोशी दाम्पत्य, मोहन मुकुंद पितळे, मंगेशी पितळे, मुकुंद पितळे (रा. अकोला), अमरावतीचा शंतनू कुर्हेकर, चंद्रशेखर कुर्हेकर, आनंद जहागीरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ह्यश्रीसूर्याह्ण आणि नागपूर येथील वासनकर समूहाने गुंतवणूकदारांना दाम दुपटीचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. ठेवी गोळा करण्यासाठी दोन्ही कंपनीने स्वतंत्ररीत्या एजंटांची नियुक्ती केली. काही एजंट तर दोन्ही कंपनींसाठी काम करत. हे एजंट ठेवीदारांना दोन्ही कंपनींच्या योजनांची माहिती देत होते. ठेवीदाराची आर्थिक क्षमता लक्षात घेऊन एजंट त्यांना योजना सांगत असत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजंट वासनकर समूहाची मेंबरशिप आणि शेअरची किंमत एक लाख रुपये सांगत होते. मात्र, गुंतवणूकदार मेंबरशिपसाठी एक लाख रुपये देण्यास तयार नसल्यास एजंट त्याला कमी किंमत असलेल्या श्रीसूर्या कंपनीची योजना सांगत असे. कोणत्याही परिस्थितीत हे एजंट गुंतवणूकदारांना सापळ्यात अडकवतच होते.