श्रेया घोषालच्या गोड आवाजानं 'मोगरा फुलला'; 'लोकमत'च्या सोहळ्यात सारेच मंत्रमुग्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 18:14 IST2018-04-12T18:14:32+5:302018-04-12T18:14:32+5:30
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटातील पुरस्कार पटकावल्यानंतर तिनं 'मोगरा फुलला' या अजरामर गाण्याच्या चार ओळी गायल्या आणि वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेलं.

श्रेया घोषालच्या गोड आवाजानं 'मोगरा फुलला'; 'लोकमत'च्या सोहळ्यात सारेच मंत्रमुग्ध
मुंबईः 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळ्याला बॉलिवूडची लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल एका वेगळ्याच उंचीवर घेऊन गेली. 'परफॉर्मिंग आर्टस' या गटातील पुरस्कार पटकावल्यानंतर तिनं 'मोगरा फुलला' या अजरामर गाण्याच्या चार ओळी गायल्या आणि वातावरण मंत्रमुग्ध होऊन गेलं. तसंच, 'पद्मावत'मधील 'घुमर' तिनं गुणगणलं आणि सगळ्यांनाच ठेका धरायला लावला.
राजकीय नेतेमंडळी, बॉलिवूडचे सेलिब्रिटी, मराठी तारे-तारका आणि इतर अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर २०१८' पुरस्कार सोहळा मंगळवारी रंगला. एकेका पुरस्कारासोबत या सोहळ्याची रंगत वाढत गेली. पुरस्कारांदरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मुलाखत, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी साधलेला संवाद, खासदार संजय राऊत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नोत्तरांच्या जुगलबंदीनं उपस्थितांना खिळवून ठेवलं. त्यानंतर, श्रेया घोषालच्या सुरांनी वरळीचं एनएससीआय डोम भारून टाकलं.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते श्रेयानं पुरस्कार स्वीकारला. त्यानंतर, अभिनेत्री किशोरी शहाणे-विज यांनी तिला बोलतं केलं. तेव्हा, तिच्या मनाच्या अगदी जवळचं आणि वातावरणाला साजेसं 'मोगरा फुलला' हे गाणं तिनं सादर केलं.