रंग रेषांमधून उलगडले श्रीगणेश

By admin | Published: September 3, 2016 06:19 PM2016-09-03T18:19:01+5:302016-09-03T18:19:01+5:30

विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेने गणेशाच्या रंगात रंगण्यासाठी चिमुकल्यांना ‘रेषा गणेश’ या अभिनव कार्यक्रमाची मेजवानी दिली

Shrignesh, unveiled by color lines | रंग रेषांमधून उलगडले श्रीगणेश

रंग रेषांमधून उलगडले श्रीगणेश

Next
>- ऑनलाइन लोकमत
अकोला : विदर्भ साहित्य संघाचा उपक्रम
अकोला, दि. 3 - गणेशोत्सवाचे वेध सर्वांनाच लागले आहेत, त्यामुळे विदर्भ साहित्य संघाच्या अकोला शाखेने गणेशाच्या रंगात रंगण्यासाठी चिमुकल्यांना ‘रेषा गणेश’ या अभिनव कार्यक्रमाची मेजवानी दिली. आंतरराष्ट्रीय किर्तीचे चित्रकार सतीष पिंपळे व प्रख्यात व्यंगचित्रकार गजानन घोंगडे यांचा कलाप्रवास नव्या पिढी समोर उलगडत त्यांनी काढलेल्या गणेश चित्राचे प्रदर्शन व प्रात्यक्षिक यामधून चिमुकल्यांच्या भावविश्वातुन अनेक गणेश प्रतिमा कागदावर उमटल्या.  प्रभात किडस् च्या सभागृहात शनिवारी दूपारी झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रख्यात कलावंत अरूण सोनोने यांचे हस्ते झाले. नाटयकर्मी अशोक ढेरे यांनी संवादकाची भूमिका साधत या कलाकांराना बोलते केले.  चिमुकल्याने अनेक प्रश्न विचारून आपल्या शंकाचे निरसन केले. या कार्यक्रमामध्ये पिंपळे व घोंगडे या दोन्ही कलावतांनी आपले अनुभव प्रेक्षकांना सांगत त्यांनी केलेली कलेची साधना उलगडून सांगीतली. यावेळी या दोन्ही कलावंतांनी काढलेल्या गणेश चित्रांचेही प्रदर्शन लावण्यात आले होते. डॉ.सिमा रोठे- शेटे, डॉ.गजानन नारे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष पुढाकार घेतला.
 
 

Web Title: Shrignesh, unveiled by color lines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.