सातपुड्याच्या कुशीत श्रीक्षेत्र धारगड यात्रा महोत्सव
By Admin | Published: August 7, 2014 08:41 PM2014-08-07T20:41:13+5:302014-08-07T22:50:22+5:30
श्रीक्षेत्र धारगड येथे श्री महादेवाचा यात्रा महोत्सव १0 व ११ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे.
आकोट : सातपुड्याच्या कुशीत असलेल्या श्रीक्षेत्र धारगड येथे श्री महादेवाचा यात्रा महोत्सव १0 व ११ ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे. या यात्रा महोत्सवामध्ये भाविकभक्तांनी सहभागी होऊन दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक श्रीक्षेत्र धारगड यात्रा सेवा समिती आकोट व धारगड सदस्यांतर्फे करण्यात आले आहे.
निसर्ग सौंदर्य व अध्यात्माचा संगम असलेला श्रीक्षेत्र धारगड यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे श्रावण महिन्याचा तिसरा रविवार १0 ऑगस्ट व सोमवार ११ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात्रा महोत्सवाची तयारी समितीतर्फे सुरू आहे, अशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे. यात्रेदरम्यान भक्तांसाठी सेवाभावी संस्था, संघटना व मंडळांतर्फे विविध सेवा-सुविधा करण्यात येणार आहेत. श्रीक्षेत्र धारगड यात्रा सेवा समिती आकोट व धारगडतर्फे भुयारावरील विद्युत रोषणाई करण्यात येईल. डॉ. प्रशांत बिबेकर, डॉ. कपील शेख यांच्यातर्फे शिवभक्तांना मोफत वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहे. आकोट बजरंग दलातर्फे धारगड भुयार येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जय बाबा बर्फानी अमरनाथ यांच्यातर्फे धारगड भुयारावर मोफत चहा, दि शेगाव श्री अग्रेसन सहकारी पतसंस्थेतर्फे फराळ, रामदेवबाबा समिती सेवा मंडळ खामगाव तर्फे अल्पोहार, अकोला अर्बन बँक कर्मचारीवृंदांतर्फे महाप्रसाद, संत रूपलाल महाराज समितीतर्फे शुद्ध जल वाटप करण्यात येईल. सरस्वती नवदुर्गा उत्सव मंडळ सेवा समिती हिवरखेड यांचेतर्फे शिरा प्रसाद, रामजी ग्रुप अध्यक्ष प्रवीण रामदास बोडखेतर्फे फराळ वाटप, सराफा बाजार नागोबा सेवा समितीतर्फे फराळ वाटप, शिवाजी ग्रुप शेगावतर्फे फराळ वाटप करण्यात येईल. अमरनाथ सेवा मंडळाद्वारे शौचालयाची व्यवस्था करण्यात येणार आहे. श्रीक्षेत्र धारगड महादेव यात्रा महोत्सवात मोठय़ा संख्येने भाविक भक्तांनी सहभागी होऊन दर्शन व प्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीक्षेत्र धारगड सेवा समिती आकोट व धारगडचे पदाधिकार्यांनी केले आहे.