मूर्ती संवर्धनाचा श्रीगणेशा
By admin | Published: July 26, 2015 02:06 AM2015-07-26T02:06:39+5:302015-07-26T02:06:39+5:30
गेल्या तीन दिवसांच्या तणावानंतर शनिवारपासून करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली. औरंगाबादहून आलेल्या पुरातत्त्व
कोल्हापूर : गेल्या तीन दिवसांच्या तणावानंतर शनिवारपासून करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीच्या रासायनिक संवर्धन प्रक्रियेला सुरुवात झाली. औरंगाबादहून आलेल्या पुरातत्त्व खात्याच्या सात तज्ज्ञांच्या पथकाने मूर्तीच्या सद्य:स्थितीची छायाचित्रे, रेखाटने यांच्या नोंदी घेतल्या.
सकाळी साडे दहा वाजता ‘पुरातत्त्व’चे अधिकारी मनेजर सिंग यांच्यासह विनोदकुमार, सुधीर वाघ, नीलेश महाजन, मनोहर सोनवणे व रेखाचित्रकार, शिल्पकार यांनी काम सुरू केले. दुसरीकडे यज्ञमंडपामध्ये सहस्रचंडी, महाअनुष्ठानाचा व लक्ष श्रीसूक्त पठणाचा दुसरा दिवस होता. सलग साडे सहा तास पाठवाचन झाले. रविवारी सकाळी महासरस्वती विधान होणार आहे. (प्रतिनिधी)
पहिल्या दिवशी पूर्ण मूर्तीचे रेखाटन, डिजिटलायझेशन छायाचित्रण आदी नोंदी करण्यात आल्या. मूर्तीच्या संवर्धनाचे काम कसे केले, त्याच्या भविष्यात पन्नास-शंभर वर्षांनीसुद्धा नोंदी मिळतील.
- मनेजर सिंग, पुरातत्त्व विभाग