नगरसेवकपद रद्द केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 07:18 PM2020-02-28T19:18:53+5:302020-02-28T19:33:39+5:30

अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदमने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते.

Shripad Chindam said that he has not yet decided whether to file a petition in the court against the government's decision to cancel the post of corporator mac | नगरसेवकपद रद्द केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणतो...

नगरसेवकपद रद्द केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणतो...

Next
ठळक मुद्देशिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला. अहमदनगर महापालिकेने मला नुकतीच आदेशाची प्रत मिळाली असून तो आदेश मी वाचला आहे. मात्र महापालिकेचा हा आदेश योग्य आहे की अयोग्य यावर इतक्यात काही बोलणं योग्य ठरणार नसल्याचे छिंदम यांनी सांगितले.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढणाऱ्या श्रीपाद छिंदमला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने आज दणका दिला. शिवाजी महाराजांविषयी अपशब्द काढल्याप्रकरणी श्रीपाद छिंदम याचे नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या सरकारने घेतला. यावर श्रीपाद छिंदमने पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत सरकारच्या नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णयाविरोधात माझा कोणावरही रोष नसल्याचे सांगितले आहे.

श्रीपाद छिंदम म्हणाला की, अहमदनगर महापालिकेने मला नुकतीच आदेशाची प्रत मिळाली असून तो आदेश मी वाचला आहे. मात्र महापालिकेचा हा आदेश योग्य आहे की अयोग्य यावर इतक्यात काही बोलणं योग्य ठरणार नसल्याचे छिंदम यांनी सांगितले. तसेच सरकारच्या निर्णयाला आव्हान द्यायचं की नाही? त्यावर याचिका दाखल करायची की नाही? याचा निर्णय अद्याप घेतला नसल्याचे श्रीपाद छिंदमने यावेळी सांगितले.

...म्हणून राणेंनी केले उद्धव ठाकरे यांचे मनापासून अभिनंदन

अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदमने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. जनक्षोभ पाहून छिंदमकडून उपमहापौरपदाचा राजीनामा घेण्यात आला होता. तसेच त्याची भाजपामधूनही हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर त्याचे नगरसेवकपदही रद्द करण्याचा ठराव अहमदनगरच्या महानगरपालिकेत पारीत करण्यात आला होता.

श्रीपाद छिंदमने यानंतर 2018मध्ये झालेली अहमदनगर महानगरपालिकेची निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. त्यावेळी  निवडणूक काळात प्रशासनाने छिंदमला शहरातून हद्दपार केले होते. मात्र असे असूनही श्रीपाद छिंदम अहमनगर महानगरपालिकेच्या प्रभाग 9 (क) मूधन सर्वसाधारण जागेवर अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आला होता. मात्र आज राज्य सरकारने छिंदमला दणका देत महापुरुषांबद्दल अपशब्द उच्चारल्याच्या आरोपाखाली नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या

Delhi Violence : देशातून धर्मनिरपेक्षता, समाजवाद अन् लोकशाही संपुष्टात, मित्रपक्षाकडून भाजपाला घरचा आहेर

पाच दिवसांचा आठवडा करण्याविरोधात न्यायालयात याचिका, ठाकरे सरकारच्या अडचणीत वाढ

Delhi Violence : पाकिस्तान्यांनो या, तुम्हाला भारताचं नागरिकत्व देतो म्हणत BSF जवानाचं घर पेटवलं

Delhi Violence : आतापर्यंत १२३ गुन्हे दाखल अन् ६३० जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Web Title: Shripad Chindam said that he has not yet decided whether to file a petition in the court against the government's decision to cancel the post of corporator mac

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.