श्रीपाल सबनीस साहित्य संमेलनाध्यक्ष

By admin | Published: November 7, 2015 04:06 AM2015-11-07T04:06:15+5:302015-11-07T04:06:15+5:30

पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राचार्य श्रीपाल सबनीस यांना मिळाला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत

Shripal Sabnis Sahitya Sammelan Chairperson | श्रीपाल सबनीस साहित्य संमेलनाध्यक्ष

श्रीपाल सबनीस साहित्य संमेलनाध्यक्ष

Next

- कवी विठ्ठल वाघ यांचा पराभव

पुणे : पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान प्राचार्य श्रीपाल सबनीस यांना मिळाला आहे. संमेलनाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सबनीस यांनी कवी विठ्ठल वाघ यांचा ११२ मतांनी पराभव केला. सबनीस यांना ४८५, तर वाघ यांना ३७३ मते मिळाली.
प्रकाशक अरुण जाखडे यांना २३० तर शरणकुमार लिंबाळे आणि श्रीनिवास वारुंजीकर यांना अनुक्रमे २५ आणि २ मते मिळाली. एक हजार ७५ पैकी १ हजार ३३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २० मते बाद ठरली. निवडून येण्यासाठी आवश्यक मतांची संख्या ५०७ होती. एकल पद्धतीने झालेल्या मतमोजणीत ५०७ मतांपर्यंत कोणीही पोहोचू शकले नाही. पहिल्या फेरीत सबनीस यांना ४३८, वाघ यांना ३२१, जाखडे यांना २२७, लिंबाळे यांना २५ तर वारुंजीकर यांना २ मते मिळाली. (प्रतिनिधी)

गुणवत्तेवर निवड
मतदारांना पोस्टाद्वारे मतपत्रिका पाठविल्या जात असल्या तरी उमेदवार किंवा त्याचे प्रतिनिधी मतपत्रिका गोळा करून निर्वाचन अधिकाऱ्यांकडे आणून देतात. उपरोक्त एकगठ्ठा मतदान पद्धती नको; ती बंद व्हायला हवी, असे मत निर्वाचन अधिकारी अ‍ॅड. प्रमोद आडकर यांनी व्यक्त केले. ही पद्धत बंद झाल्यास उमेदवार गुणवत्तेवर निवडून येईल, असेही ते म्हणाले.

Web Title: Shripal Sabnis Sahitya Sammelan Chairperson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.