श्रीरामपूर दंगल: 8 जणांना अटक, भाजपा नेत्यांसह 44 जणांवर गुन्हा
By admin | Published: May 9, 2016 03:51 PM2016-05-09T15:51:06+5:302016-05-09T15:51:06+5:30
दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघतानंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी बीजेपी जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यासह 44 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
श्रीरामपूर, दि. 9 - दुचाकी व कारमध्ये झालेल्या अपघतानंतर उसळलेल्या दंगली प्रकरणी बीजेपी जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते यांच्यासह 44 जणांवर गुन्हा दाखल झाला असून 8 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
रविवारी रात्री श्रीरामपुरात जाळपोळ, दगडफेक, लुटालूट होऊन दंगल उसळली. यात वीस दुकाने जळाली, तीन पोलीस अधिकाऱ्यांसह आठ पोलीस जखमी झाले. तर सुमारे एक कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. दंगल करणे, पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, पोलीस जिप पेटविन्याचा प्रयत्न करणे अशा विविध आरोपावरून पोलिसांनी बीजेपी जिल्हा सरचिटणीस प्रकाश चित्ते, माजी शहराध्यक्ष मारुती बिंगळे, विहींपचे विजय जैसवाल, संजय यादव यांच्यासह 44 जनांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी हे श्रीरामपुरात तळ ठोकून आहेत. श्रीरामपुरातील वातावरण शांत करण्यात पोलिसांनी यश मिळवले असून आठ जणांना अटक केली आहे.