शिरपूरमध्ये दंगल
By Admin | Published: October 9, 2016 02:07 AM2016-10-09T02:07:56+5:302016-10-09T02:07:56+5:30
गुरे वाहून नेणाऱ्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून शुक्रवारी रात्री येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली.घटनेत १२ वाहनांची नासधूस करण्यात आली असून
शिरपूर (जि. धुळे) : गुरे वाहून नेणाऱ्या एका वाहनाने कट मारल्याच्या कारणावरून शुक्रवारी रात्री येथे दोन गटांत तुफान हाणामारी झाली.घटनेत १२ वाहनांची नासधूस करण्यात आली असून संशयितांवर दंगलीचे तीन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़
जिल्हा पोलीस अधीक्षक चैतन्या एस़ हे येथील पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते़ या प्रकरणी सागर पाटील व जितेंद्र पाटील यांना पोलिसांनी अटक केली आहे. उर्वरित सर्व आरोपी फरार असून त्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. शुक्रवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास सागर सोनवणे हा मित्रांसोबत उद्यानासमोर उभा होता. त्या वेळी एका मालवाहू रिक्षाने कट मारून पळ काढला़ अंधार असल्यामुळे त्यांना गाडीचा नंबर दिसला नाही. तिचा पाठलाग केला असता ती गाडी मार्केट कमिटी आवारात दिसली़ रिक्षाचा चालक रईस गुलाब खाटीक (रा़ वरवाडे) यास कट मारल्याचा जाब विचारला त्या वेळी हाणामारी झाली. या प्रकरणी सागर सोनवणे, रईस खाटीक यांच्या परस्परविरोधी तक्रारी आणि वाहनांची नासधूस केल्याप्रकरणी सतीश मोरे यांच्या तक्रारीवरून तीन वेगवेगळे गुन्हे नोंदण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)