शुभा राऊळ भाजपामध्ये ? वादामुळे रोखला श्रद्धा जाधव यांचा फॉर्म

By Admin | Published: February 2, 2017 02:00 PM2017-02-02T14:00:12+5:302017-02-02T14:12:53+5:30

एबी फॉर्मचे वाटप केले पण तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट होताच शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांनी बंडाचे संकेत दिले आहेत.

Shubha Roul in BJP? Shradra Jadhav's form to prevent the issue | शुभा राऊळ भाजपामध्ये ? वादामुळे रोखला श्रद्धा जाधव यांचा फॉर्म

शुभा राऊळ भाजपामध्ये ? वादामुळे रोखला श्रद्धा जाधव यांचा फॉर्म

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 2 - संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी शिवसेनेने विभागप्रमुखांच्या माध्यमातून गुपचूपपणे एबी फॉर्मचे वाटप केले पण तिकीट मिळणार नाही हे स्पष्ट होताच शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवकांनी बंडाचे संकेत दिले आहेत. शिवसेनेचे परळ-लालबागमधील नगरसेवक नाना आंबोले यांच्यापाठोपाठ मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या बोरिवलीतील नगरसेविका शुभा राऊळ भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. 
 
शिवसेना उपनेते डॉ.विनोंद घोसाळकर आणि त्यांचा पूत्र सेना नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या जाचक त्रासाला त्या कंटाळल्या होत्या.आज दुपारी डॉ.राऊळ खासदार गोपाळ शेट्टी यांची भेट घेणार असून प्रभाग क्र.16मधून त्यांना एबी फॉर्म देण्यात येणारा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 
 
माजी महापौर शुभा राऊळ यांनी शिवसेनेचा एबी फॉर्म घेतला नसल्याची माहिती आहे. माजी महापौर श्रद्धा जाधव यांचा फॉर्म वादामुळे  अडकला आहे. महापौर स्नेहल आंबेकर यांना नको असलेल्या १९५ वॉर्डमधुन उमेदवारी देण्यात आली आहे. सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, नगरसेविका किशोरी पेडणेकर,शितल म्हात्रे विभाग प्रमुख आशिष चेंबूरकर, मंगेश सातमकर यांना एबी फॉर्म दिले आहेत. 
 
शिवसेनेकडून यांना एबी फॉर्म मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे
प्रभाग क्रमांक 4 :- सुजता पाटेकर 
प्रभाग क्रमांक 5 :- संजय घाडी 
प्रभाग क्रमांक 7 :- शीतल म्हात्रे 
प्रभाग क्रमांक 11 :- रिद्धी खूरसुंगे 
प्रभाग क्रमांक 14 :- भरती कदम 
 क्रमांक 18 :- संध्या दोशी 
क्रमांक- १९१- विशाखा राऊत
क्रमांक- १९४- समाधान सरवणकर
क्रमांक- १७९- तृष्णा विश्वासराव
क्रमांक- १७५- मंगेश सातमकर
क्रमांक- १९६- आशिष चेंबूरकर
क्रमांक- १९३- हेमांगी वरळीकर
क्रमांक- १९९- किशोरी पेडणेकर
क्रमांक- १९५- स्नेहल आंबेकर
क्रमांक- २०३- इंदू मसूलकर
१२३- भारती बावदाने
१२४- शामली तळेकर
१२५- रूपाली सुरेश आवळे
१३२- सुधाकर पाटील
१३३- सचिन गायकवाड
१३४- वर्षा मोहिते
१३५- समिक्षा सक्रे
१३६- शबनम शेख
१३७- संध्या आंबेकर
१३८-सुनंदा शिंदे
१३९- सुरेश पाटील
१४०- रंजना नरवड
१४१- हेमंत साळवी

Web Title: Shubha Roul in BJP? Shradra Jadhav's form to prevent the issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.