भाजपा कार्यालयात शुकशुकाट
By admin | Published: June 4, 2016 02:32 PM2016-06-04T14:32:51+5:302016-06-04T17:03:45+5:30
महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची वार्ता येताच जळगावमधील भाजपाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट पसरला.
Next
>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.०४ - महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राजीनाम्याची वार्ता येताच भाजपाच्या बळीराम पेठेतील जिल्हा कार्यालयात शुकशुकाट होता. दुसरीकडे शिवराम नगरातील खडसे यांच्या निवासस्थानी सुरूवातीस शांतता होती मात्र 12.33 वाजता खडसे यांच्या कन्या जिल्हा बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे यांचे या ठिकाणी आगमन झाले.
सकाळी 11.30 वाजेच्या दरम्यान, मुंबईतील राजकीय घडामोडींचे पडसाद हळू हळू शहरात उमटताना दिसत होते.
जिल्हा भाजपा कार्यालय
दुपारी 12 वाजेच्या सुमारास जिल्हा भाजपा कार्यालयात कार्यकत्र्याची फारशी गर्दी नव्हती. महानगर जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांच्यासह सात ते आठ कार्यकर्ते कार्यालयात होते. यानंतर 12.15 वाजेच्या दरम्यान नगरसेवक विजय गेही हे येथे आले.
वाहिन्यांचे प्रतिनिधी दाखल
भाजपा जिल्हा कार्यालयाच्या आवाराचे चित्रीकरण करण्यासाठी काही वाहिन्यांचे प्रतिनिधीही तातडीने दाखल झाले होते.
मुक्ताई बंगल्यावर गर्दी वाढू लागली
खडसे यांच्या निवासस्थानी 12 वाजेच्या सुमारास प्रथम बंदोबस्तासाठीचा एक कॉस्टेबल व घरातील कर्मचारी वर्ग होता. 12.33 वाजेच्या सुमारास जिल्हा बॅँकेच्या चेअरमन रोहिणी खडसे-खेवलकर या शिवराम नगरातील निवासस्थानी आल्या. त्यांच्या समवेत प्रांजल खेवलकर हेदेखील होते. त्या पाठोपाठ माजी महानगर प्रमुख अशोक लाडवंजारी, जिल्हा सरचिटणीस दीपक फालक हेदेखील या ठिकाणी आले. हळू,हळू या ठिकाणी गर्दी वाढत होती.
मुक्ताईनगरात बंद
खडसेंचा मतदार संघ असलेल्या मुक्ताईनगर, कोथळीत कार्यकत्र्यानी एकत्र येऊन बंदचे आवाहन करण्यास सुरूवात केली आहे. त्याला प्रतिसाद मिळाला.