‘उड्डाणपुलांखालील वाहनतळ बंद करणार’

By admin | Published: April 1, 2016 01:38 AM2016-04-01T01:38:28+5:302016-04-01T01:38:28+5:30

न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील उड्डाणपुलांखाली असणारे वाहनतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत २१ पैकी १६ वाहनतळ बंद करण्यात आली असून, तीन

'To shut down under flyovers' | ‘उड्डाणपुलांखालील वाहनतळ बंद करणार’

‘उड्डाणपुलांखालील वाहनतळ बंद करणार’

Next

मुंबई : न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईतील उड्डाणपुलांखाली असणारे वाहनतळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत २१ पैकी १६ वाहनतळ बंद करण्यात आली असून, तीन महिन्यांत उर्वरित वाहनतळ बंद करण्यात येतील, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य संदीप बाजोरिया यांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित केला. या वेळी बोलताना शिंदे म्हणाले की, ‘सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उड्डाणपुलांखालील वाहनतळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याऐवजी सदर जागेवर विविध कंपन्यांच्या सहाय्याने सुशोभिकरणाचा निर्णय झाला. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुदत संपलेले पे अँड पार्कचे ठेके बंद केले. एमएसआरडीसीने २१ पैकी १६ उड्डाणपुलांखालील वाहनतळ बंद केले.

Web Title: 'To shut down under flyovers'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.