सियाचीनमध्ये हिमकडा कोसळून शहीद झालेल्यांमध्ये साता-याचा जवान
By admin | Published: February 6, 2016 01:27 PM2016-02-06T13:27:17+5:302016-02-06T14:59:46+5:30
सियाचेनमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेल्यांमध्ये साता-यातील सुनिल विठठल सुर्यवंशी हा जवानही होता, असे समोर आले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
सातारा, दि. ६ - सियाचेनमध्ये हिमकडा कोसळून झालेल्या दुर्घटनेत शहीद झालेल्या दहा भारतीय जवानांपैकी एक जवान हा महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील असल्याचे समोर आले आहे. सुनिल विठठल सुर्यवंशी असे त्या शहीद जवानाचे नाव असून तो सातारा जिल्हयातील माण तालुक्यातील कुकुडवाड जवळील मस्करवाडी गावचा आहे. हे वृत्त मिळताच गावावर शोककळा पसरली आहे.
बुधवारी सियाचीनमध्ये हिमकडे कोसळून १० जवान त्याखाली गाडले गेले. हे १० जवान गस्तीसाठी असलेल्या चौकीला हिमवर्षावाने झोडपले, आणि एका फटक्यात ते बेपत्ता झाले. अत्यंत दुर्दैवी अशा या घटनेनंतर त्यांची वाचण्याची शक्यता धूसर असल्याचे सांगत ते १० जवान शहीद झाल्याचे संरक्षण खात्याने म्हटले होते.
हिमवर्षावाखाली गाडले गेल्यामुळे या जवानांशी असलेला रेडियो संपर्क तुटला आणि या घटनेची माहिती समजली. अत्यंत जोखमीचा हा भाग असून जवळपास २२००० फूट उंचीवर भारतीय लष्कराची प्रसिद्ध अशी बाना चौकी आहे.