उल्हासनगरातील सिद्धांत संस्थेचा थेट पंतप्रधानांशी संवाद, तिसरी लाट रोखण्यासाठी देशाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 05:45 PM2021-06-18T17:45:27+5:302021-06-18T17:46:15+5:30
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशभरात पैरामेडिकल क्रैश कोर्स माध्यमातून १ लाख कोविडयोद्धा तथा फ्रंटलाइन वर्कर्स तयार करायचे आहेत.
सदानंद नाईक
उल्हासनगर : कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशभरात पैरामेडिकल क्रैश कोर्स माध्यमातून १ लाख कोविडयोद्धा तथा फ्रंटलाइन वर्कर्स तयार करायचे आहेत. देशातील अश्या १११ सामाजिक संस्थेचे ऑनलाईन उदघाटन शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता पंतप्रधाननरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्टातून उल्हासनगरची एकमेव सिद्धांत समाज विकास संस्थेची निवड केली.
कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी देशात विविध उपक्रम राबवून खबरदारी घेतली जात आहे. अश्या कोरोना लाटेला थोपविण्यासाठी कोविड योद्धाची गरज असून तो प्रशिक्षित असला पाहिजे. असे मत पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आहे. दरम्यान केंद्र सरकारने कोविड-१९ फ्रंटलाइन वर्कर्स तयार करण्यासाठी देशातील काही संस्थेचे सर्वेक्षण केले. देशातुन एकून १११ तर महाराष्ट्रातून एकून ८ संस्थेची यासाठी निवड केली. यामध्ये उल्हासनगर मधील सिद्धांत सामाजिक संस्थेचे नाव आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी अशा संस्थेची ऑनलाईन उदघाटन करून त्यांच्या सोबत संवाद साधला आहे. देशातील ज्या ५ संस्थेशी पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन संवाद साधला. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव सिद्धांत संस्थेला मान मिळाला असून संस्थेतील विद्यार्थिनी अनिषा चव्हाण यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.
सिद्धांत सामाजिक संस्था विविध शासकीय कोर्सेस चालवीत असून संस्थेतून शेकडो परिचारिका विविध रुग्णालयात सेवा देत आहे. कोरोना काळात याच संस्थेतील प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून कर्तव्य बजाविले आहे. देशातील २६ राज्यात असे उपक्रम राबविले जात असून राज्यातून एकमेव सिद्धांत संस्थेला थेट पंतप्रधान यांच्याशी संवाद करण्याचा मान मिळाला असल्याची माहिती संस्थेचे प्रमुख सत्यवान जगताप यांनी दिली. आज खऱ्या अर्थाने संस्थेचा गौरव झाल्याची व पुढील जबाबदारी वाढल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. संस्थेत कोविड महामारी पासून बचाव करण्यासाठी कसा बचाव करावा. याचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामध्ये विविध प्रकारचे सहा कोर्सचा समावेश असल्याचे ते म्हणाले. होम केयर सपोर्ट, बेसिक केयर सपोर्ट, एडवांस केयर सपोर्ट, इमरजेंसी केयर सपोर्ट आणि सैंपल कलेक्शन सपोर्ट याशिवाय मेडिकल इक्विपमेंट सपोर्टचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जाते.
सिद्धांत संस्थेत प्रशिक्षित होण्याचे केले आवाहन
कोरोना सारख्या साथी पासून स्वतःला व देशवासीयांना वाचविण्यासाठी तरुण मुला-मुलांनी संस्थेतून अद्यावत प्रशिक्षण घ्या. असे आवाहन संस्थेचे सत्यवान जगताप यांनी केले. सर्व कोर्सेसला शासकीय मान्यता असल्याने खर्च येत नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.