साईनगरीत अवतरली ‘पंढरी’

By admin | Published: July 15, 2016 02:45 PM2016-07-15T14:45:36+5:302016-07-15T15:00:53+5:30

सार्इंनी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन दिले़ सार्इंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या भाविकांची संख्याही लाखोत आहे.

Siddhartha 'Pandhari' | साईनगरीत अवतरली ‘पंढरी’

साईनगरीत अवतरली ‘पंढरी’

Next
>- प्रमोद आहेर
ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १५ - सार्इंनी आपल्या भक्तांना विविध रूपात दर्शन दिले़ सार्इंना विठ्ठल स्वरूप मानणाऱ्या भाविकांची संख्याही लाखोत आहे. या भाविकांच्या दृष्टीने शिर्डीला पंढरपुर इतकेच महत्व आहे. जवळपास शंभर वर्षांपासुन सार्इंच्या मंदिरात रोज गायल्या जाणाऱ्या शिर्डी माझे पंढरपुर’ या संतकवी दासगणु लिखीत आरतीने या दोन धार्मिकस्थळांच व तेथील देवतांच एकत्व अधिक  दृढ झाल आहे. आषाढी व कार्तिकी एकादशीला साईनगरीत सार्इंच्या रूपात अक्षरश: पंढरपुरचा ‘विठोबा’ अवतरल्याचा भास होतो़.
आषाढी व कार्तिकी एकादशी निमीत्त  साईनगरीत सजवलेल्या पालखीत साईबाबा व विठ्ठलाची प्रतिमा ठेवुन शहरातील प्रमुख मार्गावरुन मिरवणुक काढण्यात येंते.
संत दासगणुंना बाबांनी विठ्ठल स्वरूपात दर्शन दिल्याचा साईसच्चरित्रात उल्लेख आढळतो़ बाबांच्या काळापासुन द्वारकामाईत हा उत्सव साजरा होतो़. या दिवशी पहाटे मंगलस्नानानंतर सार्इंच्या समाधीवरील मुर्तीवर पुष्प हाराच्या बरोबर तुळशीचा हार घातला जातो़ तसेच ‘शिर्डी माझे पंढरपुर’ या आरतीच्या वेळी साबुदाण्याचे खिचडीचा नेवैद्य दाखवला जातो़.
दुपारच्या मध्यान्ह आरतीच्या वेळीही फराळाच्या पदार्थांचा महानेवैद्य दाखवला जातो़. या आरतीच्या वेळी समाधीच्या चौथऱ्यावर पांडुरंगाचा फोटो ठेवला जातो़ सुर्यास्ताला धुपारतीच्या वेळी ‘युगे अठ्ठावीस़़’ही पांडुरगांची आरती म्हटली जाते. धुपारतीनंतर सार्इंच्या पादुका,सटका समाधीच्या चौथऱ्यावर दर्शनासाठी ठेवण्यात येतो़ रात्री साडेआठ वाजता ग्रामस्थ भजनी मंडळ भजन सुरू करतात.  रात्री सव्वा नऊ वाजता सार्इंचा व पांडुरंगाचा फोटो,पादुका,सटका घेवुन मिरवणुक द्वारकामाई मंदिरात येते.  द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर फोटो प्रथम बाबांच्या बसण्याच्या शिळेवर ठेवला जातो़ भजनानंतर साई-विठ्ठलाचे फोटो पालखीत ठेवले जातात. या पालखीची शहरातील प्रमुख व नियोजित रस्त्यावरुन मिरवणुक काढण्यात येते. मिरवणुक परत आल्यानंतर गुरूस्थान मंदिरा समोर भारुडाचा कार्यक्रम होतो़ त्यानंतर शेजारती होते.
आषाढी एकादशीच्या निमीत्ताने येथील रत्नपारखींच्या विठ्ठल मंदिरातही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते़ या मंदिरातील मुर्त्या बसवण्यामागे साईबाबांची प्रेरणा होती,याच मंदिरात बसुन संत दासगणुंनी जगभरातील साईभक्तांना भुरळ घालणाऱ्या ‘शिर्डी माझे पंढरपुर’ या आरतीची निर्मीती केली होती़.
शिर्डीतील सिल्व्हर ओक अकॅडमी,साई निर्माण,आदर्श विद्यालय आदी ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी विठ्ठल,रक्मीनीची तसेच वारकऱ्याची वेषभुषा घालुन गावातुन दिंडी वगैरे कार्यक्रमाचे आयोजन केले होते़

Web Title: Siddhartha 'Pandhari'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.