सोलापूरचे सिध्देश्वर मंदिर फुलांच्या सुगंधात न्हाले...
By admin | Published: August 8, 2016 06:18 AM2016-08-08T06:18:04+5:302016-08-08T06:18:04+5:30
सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर कोट्यावधी सुवासिक फुलांच्या सुगंधात आज पहाटे चार पासून न्हाउन निघाल आहे. निमित्त आहे ते श्रावण सोमवाराच.
Next
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ८ : सोलापूरचे ग्रामदैवत सिध्देश्वर मंदिर कोट्यावधी सुवासिक फुलांच्या सुगंधात आज पहाटे चार पासून न्हाउन निघाल आहे. निमित्त आहे ते श्रावण सोमवाराच.
शतकातील सिध्देश्वराच्या वास्तव्याने सोलापूरची भुमी पावन झाली.. सिध्देश्वर हे महात्मा बसवेश्वरांचे पट्टशिष्य होतेच मात्र साक्षात शिवाचे रुप त्याना मानल जात त्यामुळे श्रावणात विशेषत: सोमवारी सिध्देश्वराच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी होते. त्याच निमित्ताने श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी सिध्देश्वरांची समाधी फुलानी सजवली जाते. तब्बल आठशे किलो फुलानी गेल्या तीन दिवसापासून सुरु असलेली सजावट आज पहाटे चारला पूर्ण झाली..