सिद्धिविनायक मंदिर होते टार्गेट !

By admin | Published: February 10, 2016 04:38 AM2016-02-10T04:38:53+5:302016-02-10T04:38:53+5:30

२६/११ च्या हल्ल्यावेळी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरही टार्गेट होते. त्यासाठी हल्ल्याच्या वर्षाभरापूर्वी बारकाव्याने रेकी केली होती, अशी कबुली दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने

Siddhivinayak Temple was Target! | सिद्धिविनायक मंदिर होते टार्गेट !

सिद्धिविनायक मंदिर होते टार्गेट !

Next

मुंबई : २६/११ च्या हल्ल्यावेळी प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरही टार्गेट होते. त्यासाठी हल्ल्याच्या वर्षाभरापूर्वी बारकाव्याने रेकी केली होती, अशी कबुली दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडली याने मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी दिली.
मुंबईवर झालेल्या हल्ल्यामागे पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचाही हात होता. भारतामध्ये अतिरेकी कारवाया करणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना आयएसआय आर्थिक, नैतिक आणि लष्करी मदत करते. या तिन्ही संघटना आयएसआयच्या छत्रछायेखाली भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणतात, अशी साक्ष देऊन हेडलीने पाकच्या ‘नापाक’ इराद्यांचा आतंकी चेहरा जगासमोर आणला. (प्रतिनिधी)

‘टार्गेट’च्या यादीत सीएसटी नव्हते
२६/११ च्या हल्ल्यात सर्वाधिक मनुष्यहानी झाली, ती सीएसटी स्टेशनवर झालेल्या अंदाधुंद गोळीबाराने. मात्र, या स्टेशनची रेकी ‘टार्गेट’साठी केली नव्हती, तर हल्ला केल्यानंतर अतिरेक्यांना पळ काढता यावा, यासाठी या ठिकाणाची रेकी करण्यात आल्याचेही हेडलीने सांगितले.

बुधवारीही साक्ष : २६/११ च्या खटल्यात माफीचा साक्षीदार बनलेला ५५ वर्षीय हेडली अमेरिकेच्या तुरुंगात ३५ वर्षांची शिक्षा भोगत आहे. तेथून मंगळवारी दुसऱ्या दिवशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे त्याची साक्ष नोंदवण्यात आली. बुधवारीही हेडलीची साक्ष होणार आहे.

कारवायांमागे आयएसआय : भारतीय वेळेनुसार सकाळी सात वाजता हेडलीची साक्ष नोंदवण्यास सुरुवात झाली, ती सुमारे १२ वाजता थांबवण्यात आली. विशेष मोक्का न्यायालयाचे न्या. जी.एस. सानप यांनी तब्बल पाच तास हेडलीची साक्ष नोंदवली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्यांला प्रश्न विचारले. या प्रश्नांना उत्तर देताना हेडलीने या दहशतवादी कारवायांमागे आयएसआयचा हात असल्याचे न्यायालयाला सांगितले.

Web Title: Siddhivinayak Temple was Target!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.