संंभाजी ब्रिगेडचा मुख्यमंत्र्यांना घेराव
By admin | Published: July 14, 2016 10:28 PM2016-07-14T22:28:36+5:302016-07-14T22:28:36+5:30
राज्यभर दारूबंदी करावी, तीर्थक्षेत्र विकास निधीतील निधी कामे न केल्यामुळे पडून राहिला, नगरपालिकेकडून त्यांच्या निधीतून करण्यात आलेली कामे अतिशय निकृष्ट झाले त्याकडे
- दीपक होमकर
पंढरपूर, दि. १४ - राज्यभर दारूबंदी करावी, तीर्थक्षेत्र विकास निधीतील निधी कामे न केल्यामुळे पडून राहिला, नगरपालिकेकडून त्यांच्या निधीतून करण्यात आलेली कामे अतिशय निकृष्ट झाले त्याकडे लक्ष द्यावे यासाठी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराओ घातला. तो घेराओ पोलिसांनी हुसकावून लावताना पोलिसांसह, मुख्यमंत्र्याचे सुरक्षा रक्षक, स्वीय सहाय्यक यांनाही धक्काबुक्की झाली.
पंढरपूरच्या शासकीय विश्रमागृहात रात्री पावणेनऊच्या सुमारास ही घटना घडली. विश्रामगृह परिसरात पर्यावरण दिंडीचा समारोप कार्यक्रम आटोपल्यावर मुख्यमंत्र्यासह, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार प्रशांत परिचारक हे त्यांच्या विश्रांतीगृह कक्षात गेले. त्यानंतर पत्रकारांशी अनौपचरिक गप्पांसाठी पंधरा मिनिटांचा वेळ देऊ असा निरोप पाठविला त्यासाठी सर्व पत्रकार कॉन्फरन्स हॉलमध्ये आले. पत्रकारांशी बोलण्यासाठी बाहेर येताना संभाजी ब्रिगेडचे निवेदन घेण्यासाठी ते पाच मिनिटांसाठी बाहेर आले. मात्र नाशिक येथून आलेल्या संभाजी ब्रिगेडच्या टीमनेही राज्यभर दारूबंदी जाहिर करा असे सांगत त्यांना घेराव घातला आणि वातावरण तापले. तो घेराव तोडण्यासाठी पोलिसांनी कार्यकर्त्यांना हुसकावले व कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की झाली. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस सरळ गाडीत बसून पंतनगर येथे सपत्नीक रवाना झाले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पुणे विभागीय अध्यक्ष किरण घाडगे, नाशिक जिल्हाध्यक्ष शंकर कदम, पंढरपूर शहाराध्यक्ष स्वागत कदम आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संभाजी महाराजांनी नाकारले व्हीआयपी दर्शन
छत्रपती शाहू महाराजांचे वंशज आणि खासदार संभाजी महाराज हे काल पंढरपूरात कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांना विठ्ठलाच्या दर्शन घेण्याचे नियोजन होते. मात्र लाखो वारकरी रांगेत असल्यामुळे त्यांना थांबवून व त्यांची गैरसोय करुन व्हीआयपी दर्शन घेणे उचीत नसल्याने सांगत स्वतः संभाजी महाराजांनी दर्शन घेतले नाही मात्र मुख्यमंत्र्याच्या शासकीय पुजेत अनेक आजी-माजी आमदार, खासदार मंत्री अधिकारी घुसखोरी करून तासभर रांग ताटकळत ठेवत असल्यामुळे त्यांच्या निषेधाच्या घोषणा यावेळी घेरावामध्ये देण्यात आल्या.
सेनेकडूनही जय भवानीच्या घोषणा
भाजप सरकारडून शिवसेनेला मान दिला जात नाही. महत्वाच्या प्रसंगी डावलेल जात असल्याचे सांगत शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी यावेळी जय भवानी-जय शिवाजीचा घोषणा देत भाजपचा निषेध केला.