ढगाळ हवामानाने तापमानात लक्षणीय वाढ
By admin | Published: January 24, 2017 02:39 AM2017-01-24T02:39:23+5:302017-01-24T02:39:23+5:30
मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कोकण, गोव्याच्या काही
पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे़ कोकण, गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात तुलनेत किंचित वाढ झाली आहे़ राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते़ राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर येथे ११़२ अंश सेल्सिअस गोंदविले गेले़
पश्चिम उत्तर प्रदेश, राजस्थान, पश्चिम मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, पूर्व उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाना, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश या भागातील तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली आहे़
किमान तापमानाबरोबरच कमाल तापमानात वाढ झाली आहे़ पुण्यात पाच दिवस आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता असल्याचा अंदाज आहे़ (प्रतिनिधी)
प्रमुख शहरांतील किमान तापमान -
४पुणे १२़५, अहमदनगर ११़२, जळगाव १४़४, कोल्हापूर १६़९, महाबळेश्वर १५़३, मालेगाव १४़२, नाशिक १३, सांगली १५़५, सातारा १४़३, सोलापूर १७़१, मुंबई २१़५, अलिबाग २०, रत्नागिरी १९, पणजी २२़२, डहाणू १८़९, भिरा १९़५, औरंगाबाद १५़२, परभणी १५, नांदेड १६़५, बीड १६़२, अकोला १६़६, बुलढाणा १८, ब्रह्मपुरी १६़४, चंद्रपूर १६, गोंदिया १३़४, नागपूर १५़१, वाशिम १५़६, वर्धा १६़८, यवतमाळ १७़४
(अंश सेस्लिअसमध्ये)