सिल्लोड: शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी शिवसेना रस्त्यावर
By Admin | Published: June 7, 2017 08:50 PM2017-06-07T20:50:56+5:302017-06-07T20:50:56+5:30
कर्जमाफी,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्यावा
सिल्लोड(औरंगाबाद), दि. 7 - कर्जमाफी,शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा,स्वामीनाथन आयोग लागू करा,शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दिडपट हमी भाव द्यावा, शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी, दुधाला ५० रुपये प्रती लीटर भाव द्यावा अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेने रसत्यावर उतरुन तालुक्यातील लिहाखेड़ी फाट्यावर बुधवारी सकाळी 11 वाजता तब्बल एक तास रास्ता रोको आंदोलन करूंन विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार संजय सोनवणे यांना दिले.
शिवसेनेच्या या आन्दोलनामुळे जळगाव औरंगाबाद महामार्गावरील लिहाखेड़ी फाट्यापासून तर गोळेगाव तर अलीकडे पालोदपर्यंत अशा चार किमी पर्यन्त वाहनांच्या रांगा लागल्याने वाहनधारकांचे हाल झाले.
शिवसेना नगरसेवक तथा गटनेते सुनील मिरकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजेपासून या रास्ता रोको आंदोलनाची सुरुवात करण्यात आली.
यावेळी उपजिल्हा प्रमुख रघुनाथ चव्हाण ,महिला आघाडी जिल्हा संघटक रंजना कुलकर्णी, तालुकाप्रमुख किशोर अग्रवाल, नगरसेवक सुदर्शन अग्रवाल, किसान सेना तालुका प्रमुख कैलास वराडे,युवा सेना माजी तालुकाप्रमुख प्रवीण मिरकर, मंजुषाताई नागरे उपतालुकाप्रमुख कैलास जाधव, विभाग प्रमुख महिंद्र बावस्कर,रणजीत राजपूत,संजय कळात्रे,राजू हिवाळे,समाधान वराडे,युवा शहर प्रमुख शिवा टोम्पे,नितिन शिंगारे,योगेश साळवे,स्वप्निल शिंगारे,योगेश गिरी,संतोष पुजारे,रामेश्वर एंडोले,प्रकाश उन्मके,गणेश टोम्पे,प्रवीण गिरी,प्रकाश गायकवाड़,ईश्वर बावणे,यश प्रशाद, शिवाजी बनकर, श्रीराम सुस्ते, नारायण पुरी,अविनाश हिवाळे,अक्षय पंडित,संतोष भिवसने,विलास बावस्कर,शंकर सरोदे,अमोल वाईकर,गजानन साखळे, संदीप डापके,ज्ञानेश्वर साखळे,नितीन फरकाडे,आकाश जाधव,अंकुश लहाने,पिराजी गरुड,रमेश दळवी,शाम जायभाय,सतीश सिरसाठ,किरण सिरसाठ यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी,पदाधिकारी,कार्यकर्त्यांची उपास्तिथि होती.