निवृत्तीनाथांसाठी चांदीचा रथ

By admin | Published: January 30, 2016 01:16 AM2016-01-30T01:16:04+5:302016-01-30T01:16:04+5:30

संत निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वर येथील समाधी संस्थानच्या वैभवात चांदीच्या रथाची आता भर पडली आहे. आतापर्यंत पंढरपूर येथे साध्या रथातून जाणाऱ्या निवृत्तीनाथांची पालखीला

Silver chariot for pensions | निवृत्तीनाथांसाठी चांदीचा रथ

निवृत्तीनाथांसाठी चांदीचा रथ

Next

नाशिक : संत निवृत्तीनाथ महाराजांच्या त्र्यंबकेश्वर येथील समाधी संस्थानच्या वैभवात चांदीच्या रथाची आता भर पडली आहे. आतापर्यंत पंढरपूर येथे साध्या रथातून जाणाऱ्या निवृत्तीनाथांची पालखीला आता शुद्ध व संपूर्ण चांदीने बनविलेल्या रथातून जाणार आहे.
नाशिक येथील बाफणा ज्वेलर्सने ६० दिवसांमध्ये रथ तयार केला असून, १५ टन वजनाचा २३० किलो चांदीचा रथ रविवारी देवस्थानकडे सुपुर्द केला जाईल.
उत्तर महाराष्ट्रातील एकमेव व आगळावेगळा देखणा रथ बंगाली, बनारसी, राजस्थानी व महाराष्ट्रीयन कारागिरांनी तयार केला आहे. धार्मिक कार्य असल्याने ‘ना नफा
ना तोटा’ तत्त्वावर तयार
केलेल्या रथाच्या निर्मितीसाठी उत्कृष्टतेचा आग्रह धरण्यात
आल्याची माहिती बाफणा ज्वेलर्सचे संचालक नीलेश बाफणा यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर येथे २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या निवृत्तीनाथ यात्रेसाठी सज्ज झालेला हा
रथ शहरात शोभायात्रेद्वारे
मिरवून त्र्यंबकेश्वरी रवाना केला जाणार आहे. सागाच्या लाकडापासून रथाचा सांगाडा तयार केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Silver chariot for pensions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.