चेह-यावरचे पिंपल्स रोखण्याचे 'हे' सोपे उपाय

By Admin | Published: November 2, 2016 01:22 PM2016-11-02T13:22:45+5:302016-11-02T13:39:13+5:30

तरुण वयात चेह-यावर येणा-या तारुण्य पीटिका म्हणजेच पिंपल्स सौंदर्य बिघडवतात. पिंपल्समुळे पूर्ण सौदर्य खुलून येत नाही. प्रेमामध्येही या पिंपल्समुळे अनेकदा पंचाईत होते.

This is a simple solution to prevent facial pimples | चेह-यावरचे पिंपल्स रोखण्याचे 'हे' सोपे उपाय

चेह-यावरचे पिंपल्स रोखण्याचे 'हे' सोपे उपाय

googlenewsNext

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २ - तरुण वयात चेह-यावर येणा-या तारुण्य पीटिका म्हणजेच पिंपल्स सौंदर्य बिघडवतात. पिंपल्समुळे पूर्ण सौदर्य खुलून येत नाही. प्रेमामध्येही या पिंपल्समुळे अनेकदा पंचाईत होते. तरुण-तरुणी चेह-यावरचे पिंपल्स काढून टाकण्यासाठी त्यांना रोखण्यासाठी अनेक उपाय करतात. विशिष्ट प्रकारचे खाद्यपदार्थ टाळणे, औषधांचा लेप अशा उपायांचा त्यामध्ये समावेश असतो. पण पिंपल्स फक्त सौदर्यातच नाही तर, शरीरातही काही तरी बिघाड झाल्याचे संकेत असतात.  
 
कपाळ
पिंपल्स तुमच्या कपाळावर असतील तर त्याचा संबंध ताणाशी आहे. तुमच्यावर जो दबाव, ताण आहे तो त्यातून दिसतो. भूवया, नाकावर पिंपल्स असतील तर, किडनी, पोटाचे कार्य व्यवस्थित सुरु नसल्याचे ते लक्षण आहे. 
मद्यपान, धुम्रपान कमी करुन शाकाहारावर भर दिल्यास हे पिंपल्स कमी होऊ शकतात. 
 
गाल 
गालावर पिंपल्स असतील तर तुमच्या लिव्हर आणि फुप्फुसांचे कार्य व्यवस्थित चालू नसल्याचे संकेत आहेत. गालावरचे पिंपल्स टाळायचे असतील तर व्यायामशाळेत जास्त वेळ घालवा, मसालेदार खाणे टाळा. 
नाकाजवळ पिंपल्स असतील तर ते छोटया आतडयामध्ये असंतुलनाचे लक्षण आहे. अशावेळी तुम्ही कोल्डड्रींक पिणे टाळा. 
सेलफोन आणि उशीच्या कव्हरावरील कचराही चेह-यावरच्या पिंपल्सचे एक कारण असतो. त्यामुळे अँटीबॅक्टेरीयल वाईप्सने नियमित मोबाईल पुसण्याचा सल्ला दिला जातो. 
 
जबडा 
जबडयाच्या भागामध्ये असणारे पिंपल्स आतडे आणि मलाशयातील बिघाडीचे लक्षण आहे. भरपूर फळे आणि भाज्या खाऊन या भागातील पिंपल्सना रोखता येईल.  
 
हनुवटी 
हनुवटीवर असणारे पिंपल्स किडनी आणि पचन क्रियेशी संबंधित आहेत. पुरेसे पाणी पिऊन आणि पुरेशी झोप घेऊन तुम्ही हनुवटीवरच्या पिंपल्सना रोखू शकता. 
 
त्यामुळे पिंपल्समधून तुमचे शरीर तुम्हाला संकेत देत असते. त्याकडे दुर्लक्ष करु नका. महागडया औषधांवर पैसा खर्च करण्यापेक्षा खानपानच्या काही सवयी बदलल्या तरी तुमची पिंपल्समधून सुटका होऊ शकते. 
 

Web Title: This is a simple solution to prevent facial pimples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.