सिंहस्थाची कामे कासवगतीने!
By admin | Published: January 8, 2015 01:40 AM2015-01-08T01:40:23+5:302015-01-08T01:40:23+5:30
अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या कुंभमेळ््याची सर्वच कामे कासवगतीने सुरू असल्याची टीका आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केली.
नाशिक : अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या कुंभमेळ््याची सर्वच कामे कासवगतीने सुरू असल्याची टीका आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांनी केली.
त्र्यंबकेश्वरच्या पाहणीनंतर ते म्हणाले, त्र्यंबक येथील गोदाघाटाची अवस्था दयनीय असून, सिमेंटच्या कृत्रिम घाटामुळे नदीकाठच्या संस्कृतीचा ऱ्हास होत असल्याने हा घाट त्वरित काढून टाकावा. गोदावरीच्या उगमापासून सर्वच ठिकाणी प्रदूषण होत असल्याने पाणी अत्यंत दूषित झाले आहे. त्यासाठी सांडपाण्याच्या पाईपची वेगळी व्यवस्था करावी.
पालकमंत्र्यांचा गुरुवारी नाशिकदौरा असताना, मला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचेही महंत ग्यानदास म्हणाले. नाशिकमध्ये उभारलेली रामसृष्टीच आता वनवासात गेल्याचे टीकास्त्र त्यांनी सोडले. (प्रतिनिधी)
च्साधू-महंत व पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गुरुवारच्या कुंभमेळा आढावा बैठकीत शाही मिरवणूक मार्गाऐवजी पर्यायी शाहीमार्गाला अनुमती मिळण्याची तसेच तपोवनातील शेतकऱ्यांच्या वाढीव मोबदल्याच्या मागणीवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.