सिंधुदुर्ग: प्रेमप्रकरणातून तरूणाची डोक्यात लोखंडी पाईप मारून हत्या
By Admin | Published: January 18, 2016 10:32 AM2016-01-18T10:32:05+5:302016-01-18T10:41:39+5:30
प्रेमप्रकरणातून एका २४ वर्षीय तरूणाची डोक्यात लोखंडी पाईप मारून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली.
>ऑनलाइन लोकमत
सिंधुदुर्ग, दि. १८ - प्रेमप्रकरणातून एका २४ वर्षीय तरूणाची डोक्यात लोखंडी पाईप मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना कुडाळ-नेरुरपारमध्ये घडली आहे. जगन्नाथ उर्फ जगदीश रामचंद्र चव्हाण असं मृत तरुणाचे नाव असून तो धामापूर येथील वाळू व्यावसायिक असल्याचे समजते. रविवारी रात्री ही धक्कादायक घटना घडल्याचे समजते. मारेक-यांनी जगदीशला मारहाण करून त्याच्या डोक्यावर लोखंडी पाईपने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जगदीशचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.
या हत्येप्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिस मारेकऱ्यांना अटक करत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा चव्हाण कुटुंबियांनी घेतला आहे.