Mahesh Kale: 'आयुष्यभर एक वेदना सहन करायचीय'; प्रख्यात गायक महेश काळे यांना पितृशोक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2021 09:17 PM2021-07-19T21:17:29+5:302021-07-19T21:17:49+5:30
Mukund Kale dies: गायक महेश काळे यांनी काही तासांपूर्वी मिस यू बाबा अशी पोस्ट टाकली आहे. मुकुंद काळे यांनी महाराष्ट्र बँकेत वरीष्ठ अधिकारी म्हणूनही काम पाहीले आहे. गेली ३० वर्षे ते गोंदवले येथे अन्नदान गृहात पौर्णिमा व महोत्सवाच्या काळात सेवेकरी म्हणून काम पाहत होते.
Mahesh Kale Father: गोंदवले येथील अन्नपूर्णा घरातील प्रमुख सेवेकरी आणि प्रख्यात गायक महेश काळे (Mahesh Kale) यांचे वडील मुकुंद काळे यांचे आज पुणे येथे निधन झाले. (singer Mahesh Kale father Mukund Kale passed away )
What cannot be cured has to be endured.. a pain I have to endure for the rest of my life. I'll miss you Baba 🙏
— Mahesh Kale (@maheshmkale) July 19, 2021
सदा माझे डोला जडो तुझी मूर्ति pic.twitter.com/bh9FvAsuBq
गायक महेश काळे यांनी काही तासांपूर्वी मिस यू बाबा अशी पोस्ट टाकली आहे. तसेच जे बरे होऊ शकत नाही, ते सहन करावे लागते. आयुष्यभर मला एक वेदना सहन करावी लागणार आहे, अशी भावूक पोस्टसोबत वडील मुकंद काळे यांच्यासोबतचा फोटो महेश काळे यांनी पोस्ट केला आहे.
मुकुंद काळे यांनी महाराष्ट्र बँकेत वरीष्ठ अधिकारी म्हणूनही काम पाहीले आहे. गेली ३० वर्षे ते गोंदवले येथे अन्नदान गृहात पौर्णिमा व महोत्सवाच्या काळात सेवेकरी म्हणून काम पाहत होते. अलीकडील काळात त्यांची तब्बेत खालवली होती त्यांच्यासाठी महेश काळे यांनी गोंदवले महोत्सवात अनेकवेळा गायन सेवा केली होती. कालच महेश काळे व त्यांचे बंधू गोंदवले येथे जाऊन दर्शन घेऊन आले होते. मुकुंद काळे यांचा अतिशय प्रेमळ स्वभाव होता.