VIDEO- ' अजूनही आईचा ओरडा खाते', श्रेया घोषालबरोबर धम्माल गप्पा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2018 14:30 IST2018-04-11T14:30:52+5:302018-04-11T14:30:52+5:30
आईचा ओरडा खाण्यामध्ये गायिका श्रेया घोषालही अपवाद नाही.

VIDEO- ' अजूनही आईचा ओरडा खाते', श्रेया घोषालबरोबर धम्माल गप्पा
मुंबई- आईचा ओरडा व मार कुणालाही चुकला नाहीये. लहानपणी किंवा मोठे झाल्यावरही प्रत्येकाला चुकांसाठी आईची बोलणी ऐकावी लागतात. आईचा ओरडा खाण्यामध्ये गायिका श्रेया घोषालही अपवाद नाही. लहानपणापासून तिनेही आईचा ओरडा खाल्ला आहे. इतकंच नाही, तर अजूनही ती आईचा ओरडा खात असल्याचं तिने सांगितलं.
लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात श्रेया घोषालने हजेरी लावली होती. यावेळी रेडकार्पेटवर श्रेयासह रॅपिड फायर राऊंड रंगला. गाडी चालवताना ट्रॅफिक पोलिसांनी अडविल्यावर कधी लाच दिली आहे का? या प्रश्नावर श्रेयाने अतिशय मजेशीर उत्तर दिलं. कॉलेजमध्ये असताना एकदा गाडी चालवताना बर्गर खात होते. एका हातात बर्गर होतं व दुसऱ्या हाताने गाडी चालवत होते. त्यावेळी ट्रॅफिक पोलिसाने मला थांबवलं. तेव्हा तिथून सुटण्यासाठी मी लाच दिली होती. मला वाटतं प्रत्येक मुंबईकर याला सामोरं जातोच, असं श्रेयाने म्हटलं. आईचा ओरडा किती वर्षाची असेपर्यंत खाल्ला आहे? यावर श्रेया म्हणाली की, अजूनपर्यंत आईचा ओरडा खाते. आजही पुरस्कार सोहळ्याला येण्याच्या आधी आईचा ओरडा ऐकावा लागला होता.
पुरस्कार सोहळ्याच्या रेडकार्पेटवर श्रेया घोषाने तिचं आवडतं मराठी गाणंही गाऊन दाखवलं. 'जोगवा' सिनेमातील 'जीव रंगला..दंगला' हे गाणं श्रेयाने गायलं. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात श्रेयाने परफॉर्मिग आर्ट या विभागासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं.