एकलहरे वीजप्रकल्प लवकर सुरू करणार

By admin | Published: April 14, 2016 01:05 AM2016-04-14T01:05:48+5:302016-04-14T01:05:48+5:30

नाशिक जिल्ह्यातील एकलहरे वीज प्रकल्पातील विस्तारित ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच ते सुरू केले जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर

Single-phase power project will start soon | एकलहरे वीजप्रकल्प लवकर सुरू करणार

एकलहरे वीजप्रकल्प लवकर सुरू करणार

Next

मुंबई - नाशिक जिल्ह्यातील एकलहरे वीज प्रकल्पातील विस्तारित ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीज प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु असून लवकरच ते सुरू केले जाईल, असे ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत सांगितले.
विधानसभा सदस्य योगेश घोलप यांनी उपस्थित केलेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, म्हणाले की, एकलहरे येथील ६६० मेगावॅट विद्युत निर्मिती प्रकल्पास मान्यता मिळाली आहे. परंतू या प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी केंद्र शासनाच्या पर्यावरण व वनविभाग तसेच संरक्षण मंत्रालय आणि विमानतळ प्राधिकारणाची परवानगी मिळणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येत असून या विभागाकडून परवानगी मिळाल्यास प्रकल्पाचे काम लवकर सुरु करण्यात येईल, पुढच्या महिन्यात या सर्व विभागाची बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढू, असे आश्वासन केंद्रीय मंत्र्यांनी दिले आहे.,असे बावनकुळे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Single-phase power project will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.