विहिरीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू

By admin | Published: September 11, 2016 05:26 PM2016-09-11T17:26:37+5:302016-09-11T17:26:37+5:30

औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिवारात खेळता-खेळता विहिरीत पडून दोघा शाळकरी बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.

Sister-in-law's death by drowning in the well | विहिरीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू

विहिरीत बुडून बहीण-भावाचा मृत्यू

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
उदगीर, दि. ११ -  उदगीर शहराजवळील औद्योगिक प्रशिक्षण संस्था शिवारात खेळता-खेळता  विहिरीत पडून दोघा शाळकरी बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली आहे.
 
देवणी तालुक्यातील बोरोळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. पांडुरंग कलंबरकर यांचे उदगीरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेनजिक घर आहे. या भागात वस्ती अत्यंत विरळ आहे़ त्यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या विहिरीजवळ रविवारी दुपारी प्रजीतकुमार कलंबरकर (वय १२) व प्रणिता कलंबरकर (वय ६) हे दोघे बहीण भाऊ खेळण्यासाठी गेले होते.
 
तेथे खेळता-खेळता दोघांचाही तोल जावून कठडे नसलेल्या व पाण्याने काठोकाठ भरलेल्या विहिरीत हे दोघेही पडले ते बुडू लागल्यानंतर शेजारीच खेळत असलेल्या एका लहान मुलाने वस्तीत येवून ही घटना सांगितली. त्यानंतर डॉ.पांडुरंग कलंबरकर व वस्तीतील काही लोक विहिरीकडे धावले. 
 
परंतु, तोपर्यंत त्यांची दोन्ही मुले बुडाली होती़ काही नागरिकांनी विहिरीत त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेह सापडले नाहीत त्यामुळे अग्निशामक दलास पाचारण करण्यात आले. त्यांनी प्रजीतकुमार व प्रणिता यांचे मृतदेह बाहेर काढले. प्रारंभी खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. 
 
त्यामुळे त्यांचे मृतदेह उदगीरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे शवविच्छेदनानंतर प्रजीतकुमार व प्रणिता यांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. 
 
रविवारी उदगीर शहरातील ७ दिवसांच्या गणरायांचे विसर्जन होते़ त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. नागरिकांनी घटनास्थळावर मोठी गर्दी केली होती. दरम्यान, विसर्जन बंदोबस्तासाठी उदगीरात आलेल्या पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड व अपर पोलिस अधीक्षक लता फड यांनी उपजिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची भेट घेवून घटनेची माहिती घेतली.

Web Title: Sister-in-law's death by drowning in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.