तंग कपडे घातल्याने बहिणीची हत्या

By admin | Published: August 5, 2015 01:24 AM2015-08-05T01:24:28+5:302015-08-05T10:20:38+5:30

कॉलेजला जाताना तंग कपडे घातल्याच्या रागातून मोठ्या भावाने सोमवारी रात्री अमानुष मारहाण करत सख्ख्या बहिणीची हत्या केली. ऐश्वर्या लाड

Sister murdered wearing tight clothes | तंग कपडे घातल्याने बहिणीची हत्या

तंग कपडे घातल्याने बहिणीची हत्या

Next

कोल्हापूर : कॉलेजला जाताना तंग कपडे घातल्याच्या रागातून मोठ्या भावाने सोमवारी रात्री अमानुष मारहाण करत सख्ख्या बहिणीची हत्या केली. ऐश्वर्या लाड (१८, रा. धोत्री गल्ली) असे या दुर्दैवी मुलीचे नाव असून पोलिसांनी आरोपी ओंकार लाड (१९) यास मंगळवारी दुपारी अटक केली. ओंकार हा मनोरुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याचा वैद्यकीय दाखला नातेवाईकांनी पोलिसांना दिला आहे. त्यानुसार त्याची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
बहिणीला का मारले, याबाबत पोलिसांनी ओंकारला विचारणा केल्यावर त्याने मी क्लासमधून घरी आलो. बहीण व आई घरी होत्या. बहिणीला तंग कपडे घालून कॉलेजला जाऊ नकोस, असे सांगण्यासाठी रात्री मी बेडरूममध्ये बोलावून घेतले. तिने माझे म्हणणे ऐकण्यास विरोध केल्याने तिला मारहाण केली. मात्र असे काही होईल, याची कल्पना नसल्याचे त्याने सांगितले.
इंजिनिअरिंग डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात नापास झाल्यानंतर ओंकारने यावर्षी अकरावी वाणिज्य शाखेमध्ये प्रवेश घेतला आहे. तर ऐश्वर्या अकरावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. आईने त्यास दरवाजा उघडण्यास सांगितले. काही वेळाने त्याने दरवाजा उघडला असता ऐश्वर्या रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर बेशुद्ध पडलेली दिसली. तिच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. ऐश्वर्याच्या आईचा आक्रोश ऐकून शेजारी जमा झाले. त्यांनी जखमी ऐश्वर्याला रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: Sister murdered wearing tight clothes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.