मंत्रालयातील गाठीभेटींना बसला आळा

By admin | Published: April 4, 2015 04:49 AM2015-04-04T04:49:32+5:302015-04-04T04:49:32+5:30

बदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणाऱ्या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे.

Sit in the ministry meetings | मंत्रालयातील गाठीभेटींना बसला आळा

मंत्रालयातील गाठीभेटींना बसला आळा

Next

यदु जोशी, मुंबई
बदली अधिकाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतल्यामुळे बदल्यांसाठी मंत्रालयात होणाऱ्या भेटीगाठींना चांगलाच आळा बसल्याचे दिसून येत आहे.
एप्रिल महिना म्हटला की मंत्र्यांच्या दालनांमध्ये बदल्यांसाठी अधिकाऱ्यांची एकच गर्दी दिसते. बदल्यांचे कंत्राट घेऊन फिरणारे दलाल सक्रिय होतात. दरवर्षी दिसणारे हे चित्र या वेळी फारसे दिसत नाही. फडणवीस सरकारने बदल्यांचे विकेंद्रीकरण करत ‘अ’ वर्ग अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे विभागाच्या सचिवांना दिले आहेत. ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ वर्ग अधिकारी/कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार हे खातेप्रमुखांना देण्यात आले असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे अधिकारआदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. राजपत्रित अधिकारी महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले की, दरवर्षी मार्च आला की बदल्यांसाठी मंत्रालयातील गाठीभेटी संस्कृतीला आळा घाला असे आवाहन करणारे पत्रक महासंघ काढत असते. या वेळी पहिल्यांदाच तशी वेळ आलेली नाही. काही मोजक्या विभागांमध्ये अजूनही विकेंद्रीकरण झालेले नाही अशी तक्रार आम्ही महासंघाच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आपण सर्व विभागांना विकेंद्रीकरण करायला सांगू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.

Web Title: Sit in the ministry meetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.