सीताराम कुंटे आता गृह विभागात; लोकेशचंद्र सिडकोतून जलसंपदामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 02:06 AM2020-08-27T02:06:10+5:302020-08-27T02:06:26+5:30

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश जाधव यांची बदली झाली. ते राधाकृष्ण गमे यांची जागा घेतील.

Sitaram Kunte now in Home Department; From Lokesh Chandra CIDCO to Water Resources | सीताराम कुंटे आता गृह विभागात; लोकेशचंद्र सिडकोतून जलसंपदामध्ये

सीताराम कुंटे आता गृह विभागात; लोकेशचंद्र सिडकोतून जलसंपदामध्ये

Next

मुंबई : राज्य शासनाने बुधवारी १८ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली. कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची कुंटे यांच्या जागी सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांची बदली जलसंपदा विभागात प्रधान सचिवपदी झाली.

राधाकृष्णन बी. आता नागपूर महापालिकेचे आयुक्त झाले आहेत. कोकण विभागीय आयुक्त म्हणून अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती केली. आंशु सिन्हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या नव्या सचिव असतील. त्यांच्या जागी प्रधान सचिव एस. एम. देशपांडे जात आहेत. दीपा मुधोळ जलस्वराज्य प्रकल्पाच्या प्रकल्प व्यवस्थापक असतील.

नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कैलाश जाधव यांची बदली झाली. ते राधाकृष्ण गमे यांची जागा घेतील. परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांची बदली राज्य परिवहन महामंडळाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली. त्यांच्या जागेवर अविनाश ढाकणे नवे आयुक्त असतील. महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वामी एन. आता राष्ट्रीय आरोग्य मिशनचे नवे राज्य आयुक्त व संचालक असतील. नॅशनल रुरल लाइव्हलीहूड मिशन; नवी मुंबईच्या मुख्य कार्यकारी अधिकारी विमला आर. यांची बदली जलजीवन मिशन; मुंबईच्या संचालकपदी करण्यात आली. डॉ. नरेश गीते यांची बदली महानंदच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून महावितरण (औरंगाबाद) येथे सहव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली.

नियुक्तीच्या प्रतीक्षेतील चंद्रकांत डांगे हे भूजल सर्वेक्षण; पुणेचे नवे संचालक असतील. जलस्वराज्य प्रकल्प; नवी मुंबईच्या प्रकल्प संचालकपदी दीपा मुधोळ-मुंडे तर सिडको; नवी मुंबईच्या सहव्यवस्थापकीय संचालकपदी एस.एस.पाटील यांची बदली झाली. पाटील हे अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. रोहन घुगे यांची बदली आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आणि सहायक जिल्हाधिकारी; चंद्रपूर म्हणून झाली आहे.

Web Title: Sitaram Kunte now in Home Department; From Lokesh Chandra CIDCO to Water Resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.