पानसरे हत्याप्रकरणी एसआयटीचा आज उच्च न्यायालयात अहवाल
By admin | Published: September 29, 2016 12:31 AM2016-09-29T00:31:20+5:302016-09-29T00:31:20+5:30
ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा पुरवणी तपास अहवाल ‘एसआयटी’ उद्या गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यासाठी तपास अधिकारी तथा अप्पर पोलिस
Next
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा पुरवणी तपास अहवाल ‘एसआयटी’ उद्या गुरुवारी उच्च न्यायालयात सादर करणार आहे. त्यासाठी तपास अधिकारी तथा अप्पर पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा हे मुंबईला रवाना झाले आहेत.
पानसरे कुटुंबीयांनी तपासासंबंधी उच्च न्यायालयात रिट पिटीशन दाखल केली आहे. त्यानुसार या तपासावर उच्च न्यायालय देखरेख करत आहे. न्यायालयाने ‘एसआयटी’ने आतापर्यंत केलेल्या संपूर्ण तपासाचा अहवाल सुनावणीला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आज होणाऱ्या सुनावणीमध्ये हा अहवाल सादर केला जाणार आहे. (प्रतिनिधी)