सिंहगड कॉलेजमध्ये एसआयटीएस
By admin | Published: September 22, 2016 02:00 AM2016-09-22T02:00:02+5:302016-09-22T02:00:02+5:30
कॉलेज म्हंटलं की डोळ्यांसमोर पहिले येते ती तरुणाई, सळसळते रक्त.
पुणे : कॉलेज म्हंटलं की डोळ्यांसमोर पहिले येते ती तरुणाई, सळसळते रक्त. प्रबल इच्छाशक्ती असलेली नऱ्ह्यातील सिंहगड कॉलेजमधील तरुणाई घेऊन आली आहे एसआयटीएस स्टुडंट कौन्सिल. लोकमत, पीएनजी ज्वेलर्स व सीड इन्फोटेक यांच्या सहयोगाने यावर्षी पहिल्यांदाच कॉलेज स्तरावर असा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. २१ सप्टेंबर व २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या इव्हेंटला तरुणाईकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय.
‘लोकमत’ या कार्यक्रमाचे को- स्पॉन्सर आहेत.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयीन मुले दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. सगळीकडे आपल्या परफॉर्मन्सची तयारी व नृत्य संगीताच्या तालमींनी वेग पकडला आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयाला जणू उत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाविद्यालयीन तरूणांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. या उपक्रमामुळे सिंहगड नऱ्हेच्या विद्यार्थ्यांना एक खुप चांगला प्लटॅफॉर्म उपलब्ध झाला आहे.
कार्यक्रम पूर्णत्वास नेण्यास कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस. एन. माळी आणि एसआयटीएस स्टुडंट कौन्सिल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवक दिवस-रात्र कष्ट घेत आहेत.
या कार्यक्रमामध्ये मैत्रयुवा या सामाजिक संघटनेचा सुध्दा सहभाग आहे. एसआयटीएस गॉट टॅलेंटच्या माध्यामातून गरीब व अनाथ मुलांचेही सहकार्य लाभले जात आहे.
कार्यक्रमाला २१ व २२ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता सुरुवात होईल. कार्यक्रमाला परीक्षक म्हणून प्रख्यात कलाकार ओम भुतकर, दिग्दर्शक प्रशांत गिरकर आणि नृत्यकार
लेखा कहाते यांची उपस्थिती असणार आहे. (प्रतिनिधी)