शिवडी-न्हावा-शेवा प्रकल्पासाठी चुरस, तीन टप्प्यांसाठी १० कंत्राटदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 02:14 AM2017-09-20T02:14:52+5:302017-09-20T02:14:55+5:30
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणा-या शिवडी-न्हावा-शेवा या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे.
मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे उभारण्यात येणा-या शिवडी-न्हावा-शेवा या ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी कंत्राटदारांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पातील पहिल्या दोन टप्प्यांचे बांधकाम करण्यासाठी प्रत्येकी चार तर तिस-या टप्प्याचे बांधकाम करण्यासाठी दोन कंत्राटदार असे एकूण १० कंत्राटदार अंतिमत: शर्यतीत आहेत, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून देण्यात आली.
मुंबईला जलद ट्रॅकवर नेऊ शकणाºया ट्रान्स हार्बर लिंकसाठी एकूण सतरा कंत्राटदारांनी निविदा दाखल केल्या होत्या. त्यापैकी दहा निविदा पात्र ठरल्या. शिवडी ते १०.३८ किलोमीटरच्या लांबीच्या पहिल्या टप्प्यासाठी ज्या चार कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या; यामध्ये देउ इंजिनीअरिंग अॅण्ड कन्ट्रक्शन आणि टाटा प्रोजेक्ट्स, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन आणि एस.के. इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन, आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, इटालियन थाय डेव्हलपमेंट पब्लिक, सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन आणि लार्सन अॅण्ड टुब्रो इंडिया, आय.एच.आय. इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीमचा समावेश आहे.
१०.३८ ते १८.१८७ किलोमीटर लांबीच्या दुसºया टप्प्यासाठी
चार कंत्राटदारांनी निविदा
सादर केल्या. यामध्ये देउ इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन, टाटा प्रोजेक्ट्स, हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन, एस.
के. इंजिनीअरिंग अॅण्ड कन्स्ट्रक्शन, आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया, सिम्प्लेक्स इन्फ्रास्ट्रक्चर, इटालियन थाय डेव्हलपमेंट पब्लिक, सुमितोमो मित्सुई कन्स्ट्रक्शन, लार्सन अॅण्ड
टूब्रो आणि आय.एच.एम. इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम या कंत्राटदारांचा समावेश आहे.
१८.१८७ किमी ते चिर्ले ३.६१३ किलोमीटर लांबीच्या तिसºया टप्प्यासाठी दोन कंत्राटदारांनी निविदा सादर केल्या. यामध्ये आय.टी.डी. सिमेंटेशन इंडिया, ठाकूर
इन्फ्रा प्रोजेक्ट्स, जे.एम. म्हात्रे इन्फ्रा आणि लार्सन अॅण्ड टूब्रोचा समावेश आहे. पात्र ठरलेल्या दहा निविदांचे मूल्यांकन केल्यानंतर जायकाच्या सहमतीने यशस्वी निविदाकार घोषित करण्यात येतील, असे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे सांगण्यात आले.