एसटीकडून दुष्काळग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांची मदत

By admin | Published: January 22, 2016 03:19 AM2016-01-22T03:19:52+5:302016-01-22T03:19:52+5:30

एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून एक दिवसाचा पगार देण्यात आला आहे. यामुळे ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदतनिधी उभा राहिला

Six crores assistance for ST from drought affected ST | एसटीकडून दुष्काळग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांची मदत

एसटीकडून दुष्काळग्रस्तांसाठी ६ कोटी रुपयांची मदत

Next

मुंबई : एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदतनिधी म्हणून एक दिवसाचा पगार देण्यात आला आहे. यामुळे ६ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदतनिधी उभा राहिला असून, येत्या २३ जानेवारी रोजी एसटीच्या होणाऱ्या कार्यक्रमाप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निधी सुपूर्द केला जाणार आहे. या दिवशी राज्य शासन, परिवहन विभाग आणि एसटी महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध योजनांचा शुभारंभ आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. यात मुख्यमंत्र्यांबरोबरच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्री आणि अधिकारी उपस्थित राहतील. एसटीच्या पाच आणि परिवहन विभागाच्या दोन सेवांचा शुभारंभ यावेळी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे २३ जानेवारी रोजी मुंबई सेंट्रल येथे कार्यक्रम होणार असल्याने या दिवशी सकाळी ६ ते दुपारी दोन पर्यंत मुंबई सेंट्रल स्थानकातून सुटणाऱ्या सर्व बसेस परेल आणि दादर टीटी येथून सोडण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

Web Title: Six crores assistance for ST from drought affected ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.