सहा दिवस बँका बंद?

By admin | Published: January 19, 2015 04:45 AM2015-01-19T04:45:59+5:302015-01-19T04:45:59+5:30

देशातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) उद्या, सोमवारी अंतिम बैठक

Six days to close the bank? | सहा दिवस बँका बंद?

सहा दिवस बँका बंद?

Next

मुंबई : देशातील बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या दहाव्या द्विपक्षीय करारासाठी इंडियन बँक असोसिएशनसोबत (आयबीए) उद्या, सोमवारी अंतिम बैठक होणार असून, यात वाटाघाटी निष्फळ झाल्यास येत्या २१ ते २४ जानेवारी अशा सलग चार दिवसीय संपाचा इशारा बँक कर्मचारी संघटनेने दिला आहे. त्यानंतर २५ जानेवारी रोजी रविवार आणि २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने सलग सहा दिवस बँका बंद राहतील. परिणामी, याचा मोठा फटका ग्राहकांना बसणार आहे.
बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या संघटनेचे निमंत्रक विश्वास उटगी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरू आहे. वेळोवेळी आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. या संदर्भात अंतिम बैठक उद्या (सोमवारी) होणार आहे. सकाळी १० वाजता चार कर्मचारी संघटनाची तर दुुपारी दोन वाजता अधिकाऱ्यांच्या संघटनेची चर्चा होणार आहे. यात जर तोडगा निघाला नाही तर यापूर्वीच आम्ही दिलेल्या इशाऱ्यानुसार संप केला जाईल.
गेल्या दोन वर्षांत संघटनेने पाच वेळा संप पुकारला असून, हा आंदोलनाचा तिसरा टप्पा आहे. या संपामध्ये स्टेट बँक व स्टेट बँक समूहातील ५ सरकारी बँका, १८ राष्ट्रीयीकृत बँका, आयडीबीआय, कर्नाटक बँक, फेडरल बँक, १८ जुन्या खासगी बँका, स्टँडर्ट चार्टर्ड बँक, एचएसबीसी, सीटी बँक आणि ८ विदेशी बँकांमधील शाखा संपात सामील होणार असल्याचे संघटनेने सांगितले.
शिवाय नाबार्ड, रिझर्व्ह बँक आणि आयडीबीआय या बँकांचे कमर्चारी व अधिकारीही असे सुमारे १० लाख कर्मचारी संपात सहभागी होणार असल्याने देशातील बँकिंग व्यवहार पूर्णपणे ठप्प होतील. (प्रतिनिधी)

Web Title: Six days to close the bank?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.