नाशकातून मिळाले सहा जलदगती गोलंदाज
By admin | Published: May 6, 2014 08:19 PM2014-05-06T20:19:31+5:302014-05-07T02:23:26+5:30
जिल्ात जलदगती गोलंदाज शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यासाठीच्या विविध चाचण्यांतून सहा गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे.
नाशिक : गेल्या महिन्यामध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जिल्ात जलदगती गोलंदाज शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यासाठीच्या विविध चाचण्यांतून सहा गोलंदाजांची निवड करण्यात आली आहे. निवड केलेल्या गोलंदाजांसाठी पुणे येथे सराव शिबिर सुरू झाले आहे.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने व नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मदतीने जिल्ात राज्यातील पहिली जलदगती गोलंदाज शोधमोहीम राबविण्यात आली. यासाठी जिल्ातील पंधरा तालुक्यांमध्ये जिल्हा क्रिकेट संघटनेच्या माध्यमातून क्रिकेट खेळाडूंना आवाहन करून त्यांची त्याच ठिकाणी चाचणी घेण्यात आली होती. त्यातून सुमारे ७६ जलदगती गोलंदाजांची निवड करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे पांडुरंग साळगावकर यांनी गोल्फ क्लब मैदानावर गोलंदाजांची चाचणी घेतली होती.
या चाचणीतून सहा खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. यामध्ये भाविन पटेल, शुभम पांडे, रोहित परब, प्रकाश रोकडे, विराज ठाकूर, ऋत्विक मुळे या खेळाडंूचा समावेश आहे.