मुलखेडला सहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

By admin | Published: November 2, 2016 01:13 AM2016-11-02T01:13:49+5:302016-11-02T01:13:49+5:30

मुळा नदी काठावर असलेल्या गावात भाऊबीजेच्या मुहूर्तावर संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागून सहा घरे जळून खाक झाली

Six houses of fiery fire are found in Mulkhed | मुलखेडला सहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

मुलखेडला सहा घरे आगीच्या भक्ष्यस्थानी

Next


पौड : मुलखेड ( ता.मुळशी) मुळा नदी काठावर असलेल्या गावात भाऊबीजेच्या मुहूर्तावर संध्याकाळच्या सुमारास अचानक आग लागून सहा घरे जळून खाक झाली. सुरुवातीला बाळू बाबूराव आनंदराव तापकीर यांच्या घराने पेट घेतला़
त्यानंतर त्यालगत असलेली बाळू बाबूराव तापकीर, आनंदराव बाबूराव तापकीर, सर्जेराव रामचंद्र तापकीर, रोहिदास रामचंद्र तापकीर यांची घरे पेटली. गावातील ग्रामस्थ तसेच सभोवतालच्या गावातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. यातील काही घरे जुन्या धाटणीची लाकडाची असल्याने या घरांनी वेगाने पेट घेतला.
आगीचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. हिंजवडी एम.आय.डी.सी. एक व एरंडवणे पुणे येथील दोन अग्निशमन बंब पाचारण करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण आग आटोक्यात आणण्यात रात्रीचे ९ वाजले. या आगीत धान्य, कपाटे, चीजवस्तू , सोने, रोख रक्कम याचे नुकसान झाले. नुकसानीचा नेमका अंदाज पोलिसांना आज घेता आला नाही. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली.
घटना संध्याकाळच्या सुमारास घडल्याने मोठा अनर्थ टळळा. आग लक्षात आल्यावर गावतील सर्व लोकांनी आग विझवण्यासाठी जिवाचे रान केले. त्यामुळे धोका कमी झाला.

Web Title: Six houses of fiery fire are found in Mulkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.